Housing: दसऱ्यापूर्वीच करा ड्रीम होमची खरेदी! छ. संभाजीनगरमध्ये क्रेडाई देणार भन्नाट संधी

Last Updated:

Housing: छत्रपती संभाजीनगरमध्ये शैक्षणिक आणि औद्योगिक सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे.

Housing: दसऱ्यापूर्वीच करा ड्रीम होमची खरेदी! छ. संभाजीनगरमध्ये क्रेडाई देणार भन्नाट संधी
Housing: दसऱ्यापूर्वीच करा ड्रीम होमची खरेदी! छ. संभाजीनगरमध्ये क्रेडाई देणार भन्नाट संधी
छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातील अतिशय महत्त्वाचं शहराचा दर्जा छत्रपती संभाजीनगरला मिळालेला आहे. याठिकाणी शैक्षणिक आणि औद्योगिक सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. त्यामुळे शहरातील जमीन आणि घरांना मागणी वाढली आहे. मागणी वाढल्यामुळे किमती देखील दररोज नवनवीन उच्चांक गाठत आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जानेवारी 2026 पासून घराच्या किंमती आणखी वाढणार आहेत. या पार्श्वभूमीवर ज्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वत:चं घर खेरदी करायचं आहे, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नवरात्रीत 24 ते 28 सप्टेंबर दरम्यान क्रेडाईच्यावतीने 'ड्रीम होम एक्स्पो 2025' भरवण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक वसाहतीत दर महिन्याला राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांचा नवीन प्रकल्प उभारण्याचा आणि कोट्यवधींची गुंतवणूक करण्याची घोषणा करीत आहेत. यामुळे छत्रपती संभाजीनगरचं महत्त्व आणखी वाढत आहे. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत देखील वाढ होताना दिसत आहे. घर खरेदी करण्यास इच्छुक असलेल्याना ड्रीम होम एक्स्पोच्या माध्यमातून चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.
advertisement
कसा असेल ड्रीम होम एक्स्पो ?
होम एक्स्पो म्हणजेच गृहप्रदर्शन बीड बायपास येथील जबिंदा ग्राऊंडवर भरवण्यात येत आहे. अनेक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांच्या 300 पेक्षा जास्त गृहप्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी मिळेल. सर्व प्रकल्प रेरा नोंदणीकृत आणि टायटल क्लिअर आहेत. हा ड्रीम होम एक्स्पो चार दिवस सुरू असेल. सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी सुरू असेल. शिवाय, याठिकाणी पार्किंग आणि प्रवेश मोफत असणार आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर क्रेडाईचे अध्यक्ष संग्राम पटारे म्हणाले, "क्रेडाई ड्रीम होम एक्स्पो ही फक्त घर खरेदीची संधी नाही. तर भविष्यात प्रत्येकासाठी सुरक्षित, पारदर्शक आणि योग्य निर्णय घेण्याचं ठिकाण आहे. ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा."
लाखांपासून ते कोटींपर्यंत पर्याय
ड्रीम होम एक्स्पोमध्ये वन बीएचकेपासून ते 5 बीएचके फ्लॅटस्, रो हाऊसेस, बंगले, प्लॉट्स असे असंख्य पर्याय उपलब्ध असतील. व्यापारी, उद्योजकांसाठी विविध भागांतील व्यावसायिक प्रकल्पात ऑफिसेस, शोरुम्सही उपलब्ध असणार आहेत. या प्रॉपर्टीच्या किंमती 10 लाखांपासून ते 3 कोटी 50 लाखांच्या दरम्यान असतील.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Housing: दसऱ्यापूर्वीच करा ड्रीम होमची खरेदी! छ. संभाजीनगरमध्ये क्रेडाई देणार भन्नाट संधी
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement