Uddhav Thackeray : ‘मातोश्री’वर ड्रोनच्या घिरट्या, उद्धव ठाकरेंची सुरक्षा धोक्यात? मुंबई पोलिसांनी दिली अपडेट
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Uddhav Thackeray House Drone : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवास स्थान असलेल्या मातोश्राीवर ड्रोन द्वारे नजर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवास स्थान असलेल्या मातोश्राीवर ड्रोन द्वारे नजर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ड्रोनचा व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. मातोश्री हे निवासस्थान सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील समजले जाते. मात्र, ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवल्याच्या आरोप होत असून आता यावरुन राजकारणही तापण्याची चिन्हे आहेत. तर, दुसरीकडे मुंबई पोलिसांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, वांद्रे येथील मातोश्री परिसरात एक अज्ञात ड्रोन घिरट्या घालताना आढळला. या परिसरात कोणत्याही प्रकारचे ड्रोन किंवा हवाई साधन उडवण्यास कायद्याने बंदी आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने ड्रोन उडवण्यास मनाई आहे. अशातच आता मातोश्रीवर ड्रोनने नजर ठेवल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ठाकरेंच्या सुरक्षेच्या दृष्टीने ‘मातोश्री’ हा उच्च सुरक्षा झोन असल्याने हा प्रकार गांभीर्याने घेतला जात आहे. पोलिसांनादेखील याबाबत कळवण्यात आले आहे.
advertisement
मुंबई पोलिसांनी काय सांगितले?
मातोश्री निवासस्थान परिसरात ड्रोनच्या घिरट्या दिसल्याने अनेक चर्चांना उधाण आले. मुंबई पोलिसांनी याबाबतची माहिती दिली असून हे ड्रोन एमएमआरडीएचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी एमएमआरडीएने परवानगी घेतली होती. खेरवाडी, वांद्रे-कुर्ला संकुलातील परिसरातील सर्वेक्षणासाठी हे ड्रोन उडवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोन ड्रोन यासाठी उडवण्यात आले होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 09, 2025 12:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray : ‘मातोश्री’वर ड्रोनच्या घिरट्या, उद्धव ठाकरेंची सुरक्षा धोक्यात? मुंबई पोलिसांनी दिली अपडेट


