Eknath Shinde Sanjay Raut: मोठी राजकीय घडामोड, मुंबईत भूकंप? एकनाथ शिंदे-संजय राऊतांची भेट

Last Updated:

Eknath Shinde Sanjay Raut : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांची भेट झाली. शिवसेनेच्या फुटीनंतर हे दोन्ही नेते कोणत्याही राजकीय कटुतेशिवाय एकमेकांशी संवाद साधताना दिसले.

मोठी राजकीय घडामोड, मुंबईत भूकंप? एकनाथ शिंदे-संजय राऊतांची भेट
मोठी राजकीय घडामोड, मुंबईत भूकंप? एकनाथ शिंदे-संजय राऊतांची भेट
मुंबई: राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी मोठी घडामोड मुंबईत झाली आहे. एकमेकांवर टीकेचे प्रहार करणारे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली असल्याचे समोर आले आहे. या घटनेने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय भूंकप येणार काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.
अंबरनाथमध्ये शिंदे गटाविरोधात झालेली भाजप-काँग्रेसची आघाडी, अकोट नगर परिषदेत झालेली भाजप-एमआयएम युतीमुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले होते. त्यातच आता एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांची भेट झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांची भेट झाली. शिवसेनेच्या फुटीनंतर हे दोन्ही नेते कोणत्याही राजकीय कटुतेशिवाय एकमेकांशी संवाद साधताना दिसले.
advertisement
२०२२ मध्ये शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर 'गद्दार' म्हणत आजवर सर्वात जास्त हल्लाबोल केला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडूनही राऊतांना सडेतोड उत्तर दिले जाते. मात्र, आजच्या भेटीत दोन्ही नेत्यांमधील जुनी मैत्री पाहायला मिळाली. ही भेट पूर्वनियोजित नसून पूर्णपणे अचानक झाली होती, असे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे, महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत असताना ही भेट झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबईत एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ही भेट झाली.
advertisement

> नेमकी चर्चा काय झाली?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भेटीत कोणतीही 'राजकीय चर्चा' झालेली नाही. हे दोन्ही नेते एकाच कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच ठिकाणी होते. एकमेकांसमोर आल्यानंतर उभयतांनी स्मितहास्य करत एकमेकांची विचारपूस केली असल्याचे सांगण्यात येते.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सध्या दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. अशा धामधुमीत, जेव्हा दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर आणि रस्त्यावर एकमेकांशी भिडत आहेत, तेव्हा या दोन वरिष्ठ नेत्यांमधील हा 'संवाद' कार्यकर्त्यांसाठी नक्कीच आश्चर्याचा धक्का आहे. महाराष्ट्रात राजकीय मतभेदा पलिकडेही नेते, कार्यकर्त्यांमध्ये संवाद असतो. राजकारणात मतभेद असू शकतात, पण वैयक्तिक मैत्री कायम असते, असेही या भेटीकडे पाहिले जात आहे.
advertisement
जरी ही भेट अनौपचारिक असली, तरी महाराष्ट्राच्या बदललेल्या राजकीय वातावरणात अशा भेटीगाठींचे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आता ही भेट केवळ योगायोग होती की याचे काही अर्थ आहेत, हे लवकरच स्पष्ट होईल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde Sanjay Raut: मोठी राजकीय घडामोड, मुंबईत भूकंप? एकनाथ शिंदे-संजय राऊतांची भेट
Next Article
advertisement
Eknath Shinde Sanjay Raut:  मोठी राजकीय घडामोड, मुंबईत भूकंप? एकनाथ शिंदे-संजय राऊतांची भेट
मोठी राजकीय घडामोड, मुंबईत भूकंप? एकनाथ शिंदे-संजय राऊतांची भेट
  • महापालिका निवडणुकीसाठी सध्या दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.

  • महाराष्ट्राच्या बदललेल्या राजकीय वातावरणात अशा भेटीगाठींचे अनेक तर्कवितर्क

  • एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांची भेट झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे

View All
advertisement