BJP Shiv Sena Shinde: पहाटे १०० पोलीस घरात घुसले! झाडाझडतीनंतर शिंदे गटाच्या शिलेदाराचा स्फोटक आरोप

Last Updated:

Shiv Sena vs BJP : राज्यातील काही ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत दिसून येणार आहे. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी गंभीर आरोप केला आहे.

पहाटे १०० पोलीस घरात शिरले, झाडाझडती घेतली, शिंदेंच्या शिलेदाराचा मोठा आरोप
पहाटे १०० पोलीस घरात शिरले, झाडाझडती घेतली, शिंदेंच्या शिलेदाराचा मोठा आरोप
मनिष खरात, प्रतिनिधी, हिंगोली: नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडला असताना दुसरीकडे महायुतीमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील वाद चांगलाच उफाळून आला आहे. राज्यातील काही ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत दिसून येणार आहे. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी गंभीर आरोप केला आहे. सकाळी ६ वाजता माझ्या घरी पोलीस शिरले आणि झाडाझडती घेतली असल्याचा आरोप बांगर यांनी केला. आपल्या नातेवाईकांनाही त्रास दिला जात असल्याचे बांगर यांनी म्हटले.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी एक धक्कादायक खुलासा केला. पहाटे सहा वाजता त्यांच्या निवासस्थानी तब्बल शंभर पोलिसांनी छापा टाकल्याचा दावा त्यांनी केला आहे. बांगर यांनी माध्यमांशी बोलताना भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांचे नाव घेता टीकास्त्र सोडले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस २८ नोव्हेंबर रोजी हिंगोलीत जाहीर सभा घेत आहेत. त्या आधीच संतोष बांगरांनी खळबळजनक आरोप केले आहेत. कळमनुरीत बांगर यांनी भाजपविरोधात शिंदे गटाचा स्वबळावर उमेदवार उभा केला आहे,
advertisement
सकाळी सहा वाजता शंभर पोलीस घराच्या आवारात...
आमदार बांगर म्हणाले, “पहाटे सहा वाजता सर्वजण झोपलेले असताना माझ्या घरासमोर शंभर पोलिसांचा ताफा उभा राहिला. घराची झाडाझडती घेतली. कपाटं, कपडे, फ्रिजमधील साहित्य, सगळं सामान बाहेर काढलं. घरासमोर छावणी उभारल्यासारखी स्थिती होती. त्यांनी पुढे म्हटले की, “पोलीस प्रशासनावर दबाव आणून एखाद्या सत्ताधारी विरोधकाच्या घराची झडती घेतली जात असेल, तर हे लोकशाहीला घातक असल्याचे बांगर यांनी म्हटले.
advertisement
नातेवाईकांना नोटिसा देणं सुरू....
बांगर यांनी आरोप करत सांगितलं की, त्यांच्या नातेवाईकांना नोटिसा देण्याचे प्रकार सुरू आहेत. हे राजकीय सूडाचे राजकारण आहे,” असा दावा करत त्यांनी कारवाई मागे कोणाचा दबाव आहे हे सर्वांना माहित असल्याचं सुचवलं.
शिंदे-गट भाजपात आरोप प्रत्यारोप...
संतोष बांगर हे अवैध धंदे करतात असल्याचा आरोप आमदार तानाजी मुटकुळे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. हिंगोली पोलीस आमदार बांगर यांना पाठीशी घालत असल्याचा देखील आमदार मुटकुळे म्हणाले होते. या आरोपानंतर हिंगोली पोलिसांच्या पथकाने संतोष बांगर यांचे निवासस्थान असलेल्या वंजारवाडा भागात छापा टाकत घराची झडती घेतली. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईच्या टायमिंगची चर्चा सुरू झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP Shiv Sena Shinde: पहाटे १०० पोलीस घरात घुसले! झाडाझडतीनंतर शिंदे गटाच्या शिलेदाराचा स्फोटक आरोप
Next Article
advertisement
BJP Shiv Sena Shinde:  पहाटे १०० पोलीस घरात घुसले! झाडाझडतीनंतर शिंदे गटाच्या शिलेदाराचा स्फोटक आरोप
पहाटे १०० पोलीस घरात घुसले! झाडाझडतीनंतर शिंदे गटाच्या शिलेदाराचा आरोप
  • पहाटे १०० पोलीस घरात घुसले! झाडाझडतीनंतर शिंदे गटाच्या शिलेदाराचा आरोप

  • पहाटे १०० पोलीस घरात घुसले! झाडाझडतीनंतर शिंदे गटाच्या शिलेदाराचा आरोप

  • पहाटे १०० पोलीस घरात घुसले! झाडाझडतीनंतर शिंदे गटाच्या शिलेदाराचा आरोप

View All
advertisement