advertisement

जमिनीच्या तुकड्यासाठी बापाचाच बळी! हिंगणगावात थोरल्या भावाचं सैतानी कृत्य; वडील-भावाची हत्या

Last Updated:

हिंगणगाव येथे जमिनीच्या वादातून एका नराधम मुलाने आपल्या वृद्ध पित्यासह सख्ख्या धाकट्या भावाची कुऱ्हाडीने आणि खोऱ्याने वार करून निर्घृण हत्या केली आहे.

News18
News18
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातून माणुसकीला काळिमा फासणारी आणि रक्ताच्या नात्यावरचा विश्वास उडवणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव येथे जमिनीच्या वादातून एका नराधम मुलाने आपल्या वृद्ध पित्यासह सख्ख्या धाकट्या भावाची कुऱ्हाडीने आणि खोऱ्याने वार करून निर्घृण हत्या केली आहे. शेतीच्या तुकड्यासाठी पोटच्या मुलानेच बापाचा खून केल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.
जमिनीचा तुकडा माणसाच्या जीवावर बेतू शकतो याचा प्रत्यय हिंगणगाव येथे आला आहे. हिंगणगावच्या कुंडले कुटुंबात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या जमिनीच्या वादाचे रूपांतर अखेर भीषण दुहेरी हत्याकांडात झाले. संभाजी मारुती कुंडले (वय 47) याने आपले वडील मारुती बंडू कुंडले (वय 72) आणि धाकटा भाऊ शीतल मारुती कुंडले (वय 45) यांची शेतातच अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. या हल्ल्यात संभाजीचा मुलगा विवेक हा देखील जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
advertisement

नेमका वाद काय होता?

कुंडले कुटुंबाची हिंगणगाव शिवारात तीन एकर शेती आहे. यातील दोन एकर जमीन वडील मारुती आणि धाकटा भाऊ शीतल यांच्याकडे होती, तर केवळ एक एकर जमीन संभाजीच्या वाट्याला आली होती. या विषम वाटणीमुळे संभाजीच्या मनात गेल्या अनेक वर्षांपासून संताप धुमसत होता. यापूर्वीही त्याने वडिलांच्या डोक्यात लोखंडी पहार मारून त्यांना जखमी केले होते. चार दिवसांपूर्वीच हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले होते, मात्र पोलिसांनी वेळीच कठोर पावले उचलली असती तर आज हे दोन जीव वाचले असते, अशी संतप्त भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
advertisement

पोलीस स्थानकात आरोपीने स्वत:च दिली कबुली

रविवारी दुपारी वडील मारुती आणि भाऊ शीतल हे शेतात कामात व्यस्त होते. यावेळी संभाजी तिथे पोहोचला आणि पुन्हा जमिनीवरून शाब्दिक चकमक उडाली. रागाच्या भरात संभाजीने जवळच असलेली कुऱ्हाड आणि खोरे उचलून दोघांच्याही डोक्यात वार केले. घाव इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या कृत्यानंतर आरोपी संभाजीने स्वतः हातकणंगले पोलीस ठाणे गाठून गुन्ह्याची कबुली दिली.
advertisement

पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह विहिरीजवळ रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा जमिनीच्या वादापायी असा दुर्दैवी अंत झाल्याने हिंगणगावावर शोककळा पसरली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जमिनीच्या तुकड्यासाठी बापाचाच बळी! हिंगणगावात थोरल्या भावाचं सैतानी कृत्य; वडील-भावाची हत्या
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement