नाव मोठं लक्षण खोटं, माजी महापौराच्या फॉर्म हाऊसवर धक्कादायक प्रकार उघड, जळगावमध्ये खळबळ
- Published by:Sachin S
Last Updated:
परदेशातील नागरिकांना आकर्षक प्रस्ताव दाखवून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली जात होती. या छाप्यात पोलिसांनी ३२ लॅपटॉप आणि ७ मोबाईल जप्त केले आहे.
विजय वाघमारे, प्रतिनिधी
जळगाव: देशभरात सध्या सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. केंद्र सरकारकडून वारंवार सायबर गुन्ह्यासंदर्भात जनजागृती केली जात आहे. पण तरीही सायबर गुन्हे काही केल्या कमी होत नाहीये. अशातच जळगावमध्ये एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फॉर्महाऊसवर बनावट कॉल सेंटर सुरू असल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी या कॉल सेंटरचा पर्दाफाश करून ८ जणांना अटक केली आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्या मालकीच्या ममूराबाद रस्त्यावर ‘एलके फॉर्म हाऊस’ आहे. या फॉर्म हाऊसवर बनावट कॉल सेंटर चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या फॉर्म हाऊसवर धडक कारवाई करत बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड केला आहे. या प्रकरणात माजी महापौर ललित कोल्हे याच्यासह आठ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. जळगावच्या महापौर राहिलेल्या व्यक्तीकडून बनावट कॉल सेंटर चालवला जात असल्याचं उघड झाल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
advertisement
परदेशी नागरिकांना फसवलं
या बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून परदेशातील नागरिकांना आकर्षक प्रस्ताव दाखवून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली जात होती. या छाप्यात पोलिसांनी ३२ लॅपटॉप आणि ७ मोबाईल जप्त केले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी कोणती माहिती किंवा मोठे रॅकेट उघडकीस येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Location :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
September 28, 2025 8:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नाव मोठं लक्षण खोटं, माजी महापौराच्या फॉर्म हाऊसवर धक्कादायक प्रकार उघड, जळगावमध्ये खळबळ