1xBet घोटाळ्यात युवराज-रैनाचे नाव, गुन्ह्यातून मिळवली कमाई, संपत्ती जप्त होणार? ईडीची मोठी कारवाई तयारीत
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Online Betting Case: ऑनलाइन बेटिंग प्रकरणात ईडी मोठ्या कारवाईच्या तयारीत असून युवराज सिंग, सुरेश रैना, मिमी चक्रवर्ती यांसारख्या दिग्गजांची संपत्ती जप्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एंडोर्समेंट फी ही ‘गुन्ह्याची कमाई’ असल्याचा संशय बळावला आहे.
नवी दिल्ली : ऑनलाइन बेटिंग आणि गेमिंग प्लॅटफॉर्म 1xBet शी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने (अंमलबजावणी संचालनालयाने) कारवाई सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तपास यंत्रणा लवकरच काही खेळाडू आणि अभिनेत्यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त करण्याच्या तयारीत आहे. ही संपत्ती कथितरित्या एंडोर्समेंट फीमधून खरेदी केली गेली असून ती गुन्ह्यातून मिळालेली कमाई (Proceeds of Crime) असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
advertisement
चौकशीत आलेली मोठी नावं
या प्रकरणात अनेक दिग्गजांची चौकशी झाली आहे. क्रिकेटपटूंमध्ये युवराज सिंग, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा आणि शिखर धवन यांची ईडीने चौकशी केली आहे. चित्रपटसृष्टीतून सोनू सूद, मिमी चक्रवर्ती आणि अंकुश हजरा यांना देखील ईडीचे प्रश्न झेलावे लागले आहेत. अभिनेत्री उर्वशी रौतेला जी 1xBet ची इंडिया अॅम्बेसडर राहिली असून तिलाही समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र ती सध्या विदेशात असल्याने चौकशीसाठी उपस्थित राहू शकली नाही.
advertisement
विदेशातील मालमत्तांचीही चौकशी
ईडीला संशय आहे की- काही मालमत्ता परदेशातही आहेत. त्यामुळे एजन्सीने आता त्यांच्यावरही लक्ष केंद्रीत केले आहे. मनी लॉन्ड्रिंगच्या साखळीपर्यंत पोहोचण्यासाठी ईडी बँक खाते, व्यवहार आणि प्रॉपर्टी डील्सची सविस्तर चौकशी करत आहे.
22 कोटी युजर्स आणि बॅन
advertisement
ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म 1xBet चे भारतात मोठे जाळे होते. याचे 22 कोटींहून अधिक युजर्स होते. अलीकडेच केंद्र सरकारने ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंग प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली आहे. मात्र त्याआधी हा प्लॅटफॉर्म वेगाने युजर्स जमा करत होता.
advertisement
चार्जशीटची तयारी
सूत्रांच्या माहितीनुसार, ईडी लवकरच संपत्ती जप्त केल्यानंतर या प्रकरणात चार्जशीट दाखल करेल. यात स्पष्ट करण्यात येईल की कोणत्या व्यक्तींच्या कमाईचा थेट संबंध 1xBet च्या बेकायदेशीर उत्पन्नाशी आहे. एजन्सीचा फोकस फक्त एंडोर्समेंट फीपुरता मर्यादित नाही, तर या रकमेचा उपयोग संबंधित व्यक्तींनी इतर गुंतवणुकीत किंवा व्यावसायिक उपक्रमांमध्ये केला का हेही तपासलं जात आहे. जर असं आढळलं तर त्यावरही कारवाई होणार आहे.
advertisement
ईडीच्या म्हणण्यांनुसार ही केस फक्त एका बेटिंग कंपनीपुरता मर्यादित नाही, तर भारतातील ऑनलाइन सट्टेबाजी नेटवर्क आणि त्यामार्फत होणाऱ्या मनी लॉन्ड्रिंग रॅकेटचा भाग आहे. ज्याला पूर्णपणे मोडून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 28, 2025 8:32 PM IST
मराठी बातम्या/मनी/
1xBet घोटाळ्यात युवराज-रैनाचे नाव, गुन्ह्यातून मिळवली कमाई, संपत्ती जप्त होणार? ईडीची मोठी कारवाई तयारीत