advertisement

लातूरमध्ये कार आणि टेम्पोचा भीषण अपघात, 4 महिला जागीच ठार

Last Updated:

उदगीर तालुक्यातील एकुरकाजवळ कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 महिला जागीच ठार झाल्या आहेत. तर तीन जण जखमी झाले आहे

News18
News18
लातूर : लातूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. उदगीर तालुक्यातील एकुरकाजवळ कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 महिला जागीच ठार झाल्या आहेत. तर तीन जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उदगीर तालुक्यातील एकुरकाजवळ आज गुरुवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मारुती स्विफ्ट डिझायर कारने या महिला उदगीरहून एकुरगाकडे जात होत्या. एकुरगा गावाजवळ पोहोचले असताना भरधाव आयशर टेम्पोला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा चुराडा झाला. अपघातात चार महिला जागीच ठार झाल्या.
advertisement
या अपघातात मंगलबाई गोविंद जाधव (वय ५५ वर्ष राहणार एकुरका) प्रतिभा संजय भंडे (वय ३० राहणार दावणगावं), प्रणिता पांडुरंग बिरादार (वय २५ राहणार होणाळी) अन्यना रणजित भंडे (वय १४ वर्षस राहणार दावणगावं) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. अन्य तिघा जखमीवर उपचार सुरू आहेत. सर्व मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी उदगीर सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकाच वेळी चार महिलांचा मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. रुग्णालयाच्या परिसरात कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. या प्रकरणाची पोलिसांनी नोंद केली असून अधिक तपास करत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लातूरमध्ये कार आणि टेम्पोचा भीषण अपघात, 4 महिला जागीच ठार
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement