advertisement

Fengal Cyclone: फेंगलचा अर्थ काय, चक्रीवादळाला नाव कोणत्या देशानं दिलं?

Last Updated:

Fengal Cyclone: मुंबईसह उपनगरात हुडहुडी वाढवणाऱ्या फेंगल या चक्रीवादळाला नाव कसं मिळालं, कोणत्या देशानं दिलं? कसं ठरवलं जातं चक्रीवादळाचं नाव

News18
News18
मुंबई : पश्चिम बंगालच्या उपसागरात नैऋत्य दिशेनं दबाव तयार झाला असून आज चक्रीवादळ येणार आहे. उत्तर-वायव्य दिशेकडे हा दबाव सरकला आहे. 27 नोव्हेंबरपर्यंत ते आणखी तीव्र होऊन चक्री वादळात रूपांतरित होईल. या चक्रीवादळाला फेंगल असं नाव दिलं आहे. या चक्रीवादळामुळे गारा, वादळी वाऱ्यासह अति मुसळधार पावसाचा इशारा दक्षिणेकडील राज्यांना दिला आहे.
महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडेल असा इशारा दिला आहे. पुढचे 7 दिवस कडाक्याची थंडी पडणार आहे. राज्यात 3 डिग्रीपर्यंत तापमान आणखी घसरण्याची शक्यता आहे. तर दिवसा देखील तापमान कमी राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळणार आहे. सध्या महाराष्ट्रात कोणताही पावसाचा इशारा देण्यात आला नाही.
फेंगल या शब्दाचा अर्थ आहे उदासीन, हा अरेबिक भाषेतला शब्द आहे. चक्रीवादळाचे नाव 'फेंगल' सौदी अरेबियाने प्रस्तावित केले होते आणि त्याचे मूळ अरबी भाषेतून घेतले आहे. हे नाव भाषिक वारसा आणि सांस्कृतिक ओळख यांच्या मिश्रणाचे प्रतीक आहे, जागतिक हवामान संघटना (WMO) आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर आशिया अँड द पॅसिफिक (UNESCAP) नामकरण पॅनेलमधील प्रादेशिक विविधतेवर जोर देतं.
advertisement
सुरुवातीला वादळांना कोणताही देश नावं देऊ शकत होता, मात्र त्यामुळे गोंधळ होऊ लागला नंतर, हवामानशास्त्रज्ञांनी अधिक संघटित आणि कार्यक्षम प्रणाली अंतर्गत एका यादीतून वादळांची नावे देण्याचा निर्णय घेतला. भारतीय हवामान विभाग (IMD) हे चक्रीवादळाचे नाव देण्याचे काम केलेल्या सहा प्रादेशिक विशेषीकृत हवामान केंद्रांपैकी (RSMCs) एक आहे.
युनायटेड नेशन्स एजन्सी जागतिक हवामान संघटना (WMO) च्या मते, एका विशिष्ट भौगोलिक स्थानावर किंवा संपूर्ण जगामध्ये एका वेळी एकापेक्षा जास्त चक्रीवादळ असू शकतात आणि ते एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळ ती राहू देखील शकतात. बचाव कार्य आणि नियोजन करण्यासाठी प्रत्येक वादळाला वेगळं नाव दिलं जातं. गोंधळ टाळण्यासाठी हे प्रयोजन करण्यात आलं आहे.
advertisement
जेव्हा उत्तर हिंद महासागरावरील वाऱ्याचा वेग 62 किमी प्रतितास या कमाल मर्यादेपेक्षा जास्त होतो, तेव्हा त्याचे वर्गीकरण वादळ/चक्रीवादळ/ अशा दोन प्रकारे केलं जातं. प्रत्येक देश वादळाला नाव देतो. देशांनी दिलेल्या नावांची यादी तयार केली आहे. ते लिंग, राजकारण, धार्मिक श्रद्धा आणि संस्कृतींबाबत तटस्थ असतात. एकदा एखादे नाव वापरले की ते पुन्हा वापरता येत नाही.
advertisement
आठ अक्षरांपेक्षा जास्त हे नाव असू नये अशी एक नियमावली देखील तयार करण्यात आली आहे. याशिवाय हे नाव कोणत्याही देशाचा अपमान करणारे नसावे असही यामध्ये म्हटलं आहे. बांग्लादेश, भारत, इराण, पाकिस्तान, मालदीव, म्यानमार, ओमान, कतार, साउदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, UAE, येमेन हे 13 देश चक्रीवादळाची नावं ठरवतात.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Fengal Cyclone: फेंगलचा अर्थ काय, चक्रीवादळाला नाव कोणत्या देशानं दिलं?
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement