चेंबरमध्ये घुसून धुतलं,मग बुट फेकून मारला, छत्रपती संभाजीनगर कोर्टात भयंकर राडा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
सरन्यायाधीश बीआर गवई यांना बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात आला होता.
Chhatrapati Sambhaji Nagar :अविनाश कानडजे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : सरन्यायाधीश बीआर गवई यांना बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात आला होता.त्यानंतर आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोर्टात वकिलांनी लेखणी बंद निदर्शने आंदोलन ठेवले होते.पण तरी देखील एका वकिलाने काम सूरूच ठेवल्याने आणि लोगो न लावल्याने त्याला चेंबरमध्ये घूसून मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच त्याला बूट फेकून मारल्याचाही प्रकार घडला आहे. ए जी पी देशपांडे असे या मारहाण झालेल्या वकिलाचे नाव आहे. या घटनेने कोर्ट परिसरात खळबळ माजली आहे.
सरन्यायाधीश बीआर गवई यांच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात घडलेल्या या घटनेचा निषेध करण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोर्टात लेखणी बंद निदर्शने आंदोलन पुकारण्यात आले होते.या आंदोलनात असंख्य वकील सहभागी झाले होते. पण सरकारी अॅडवोकेट जी पी देशपांडे यांनी काम चालू ठेवले होते आणि निषेधाचा लोगो देखील लावला नव्हता.या घटनेची माहिती अॅडवोकेट महादेव लोखंडे यांना कळताच त्यांनी अॅडवोकेट जी पी देशपांडे यांच्या चेंबरमध्ये घूसून त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. यासोबत त्यांच्यावर बूट फेकून मारला.ही घटना जिल्हा न्यायालयात साडेपाच ते सहाच्या दरम्यान घडली होती. या घटने संदर्भात वेदांत नगर पोलीस ठाण्यात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या घटनेने खळबळ माजली आहे.
advertisement
प्रकरण काय?
सुप्रीम कोर्टाच्या सु्नावणी दरम्यान राकेश किशोर या वकिलाने सरन्यायाधीर बीआर गवई यांना बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. या घटनेवर बी.आर.गवई यांनी संबंधित वकिलावर कोणतीही कारवाई करण्याचे आदेश दिले नव्हते.या उलट त्यांनी या सर्व गोष्टीमुळे विचलित होण्याची गरज नाही.अशा गोष्टीचा माझ्यावर परिणाम होत नाही,असे त्यांनी सांगितले होते.
advertisement
तर या घटनेवर हल्ला करणारे वकील राकेश किशोर म्हणाले होते की, मला या कृत्याचा पश्चाताप नाही.आपण तुरुंगवासही भोगण्यास तयार आहोत. तसेच दैवी शक्तीमुळे हे कृत्य केल्याचे त्यांनी सांगितले होते.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
October 14, 2025 9:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चेंबरमध्ये घुसून धुतलं,मग बुट फेकून मारला, छत्रपती संभाजीनगर कोर्टात भयंकर राडा