पेट्रोल न मिळाल्यामुळे तरुणाला आलं टेन्शन, दारूच्या नशेत दुचाकी रस्त्यावर पेटवली, छ.संभाजीनगरमधला VIDEO
- Published by:Sachin S
Last Updated:
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवली आणि वाहतूक सुरळीत केली.
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
सिल्लोड: इराण आणि इस्त्रायलमधील युद्धामुळे जगभरात इंधनचा तुडवडा निर्माण झाला आहे. भारतातही अनेक भागामध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. एकीकडे केंद्र सरकार इंधनाचा तुटवडा झाला नाही असं सांगत आहे. पण, ग्रामीण भागामध्ये पेट्रोल पंपावर मात्र, टंचाई जाणवत आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोडमध्ये "पेट्रोल मिळत नसेल तर गाडी कशाला पाहिजे' असं म्हणत तरुणाने भर रस्त्यावर स्वतःची दुचाकी पेटवून दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण, हा दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेल टंचाईच्या अफवेमुळे एका तरुणाने पेट्रोल डिझेल मिळणार नसेल तर मोटरसायकल काय करायची असं म्हणत भररस्त्यात स्वतःची मोटारसायकल पेटवून दिल्याचा प्रकार घडला आहे.
पेट्रोल मिळत नसेल तर गाडी कशाला पाहिजे, म्हणत तरुणाने भर रस्त्यावर पेटवली स्वतःची दुचाकी, छत्रपती संभाजीनगरमधील घटना pic.twitter.com/qLsUU8mnf4
— VIRALबाबा (@viralmedia70) March 28, 2026
advertisement
.
शरद भोजने असं दुचाकी पेटवणाऱ्या तरुणाचे नाव असून, हा प्रकार सिल्लोड-कन्नड मार्गावर शुक्रवारी संध्याकाळी घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवली आणि वाहतूक सुरळीत केली.
दारू प्यायलेला होता तरुण
दरम्यान, संबंधित तरुण दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली असून, सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 9:53 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पेट्रोल न मिळाल्यामुळे तरुणाला आलं टेन्शन, दारूच्या नशेत दुचाकी रस्त्यावर पेटवली, छ.संभाजीनगरमधला VIDEO









