अहिल्यानगर महापालिकेत गटनेते ठरले! राष्ट्रवादीकडून प्रकाश भागानगरे, भाजपाकडून शारदा ढवण यांची निवड
- Published by:Prachi Amale
Last Updated:
अहिल्यानगर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या गटनेतेपदी प्रकाश भागानगरे यांची निवड करण्यात आली आहे.
साहेबराव कोकणे, प्रतिनिधी
अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिकेतील सत्तासमीकरणांना आता स्पष्ट दिशा मिळू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपाने आपापल्या गटनेत्यांची घोषणा केली असून, यामुळे महापालिकेतील आगामी राजकारण अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे.
अहिल्यानगर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या गटनेतेपदी प्रकाश भागानगरे यांची निवड करण्यात आली आहे. तर भाजपाच्या गटनेतेपदी शारदा ढवण यांच्यावर पक्षाने विश्वास टाकला आहे.
advertisement
महापालिकेतील सध्याच्या संख्याबळाचा विचार करता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 27 नगरसेवक असून भाजपाकडे 25 नगरसेवक आहेत. त्यामुळे महापालिकेतील प्रत्येक निर्णय आणि पुढील सत्ता-समीकरणात दोन्ही पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
अहिल्यानगरमधील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष
गटनेत्यांच्या निवडीनंतर आता महापौरपद, स्थायी समिती आणि इतर महत्त्वाच्या पदांवरील हालचालींना वेग येणार असल्याचे चित्र आहे. अहिल्यानगरमधील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
advertisement
निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी अजित पवार गटाचं स्पष्ट बहुमत
अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी अजित पवार गट युतीने स्पष्ट बहुमत मिळवत नगर शहराच्या सत्तेवर झेंडा फडकावला आहे. 68 जागांच्या महापालिकेत युतीने तब्बल 52 जागांवर विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व सिध्द केले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सर्वाधिक जागा मिळवून 27 जागांसह प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला असून युतीमधील भाजपने 25 जागा जिंकत दुसरे स्थान पटकावले आहे.
advertisement
कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या?
भाजप 25 जागांसह दुसर्या क्रमांकावर राहिला असून, त्यातील तीन जागा बिनविरोध होत्या. महायुतीतून ऐनवेळी बाहेर पडत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलेल्या शिवसेना (शिंदे गट) ने 10 जागा जिंकत आपले अस्तित्व राखले. मात्र, पक्षाच्या अनेक प्रमुख नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला एकही जागा मिळवता आली नाही. काँग्रेसला केवळ दोन, तर शिवसेना ठाकरे गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले. एमआयएमने दोन, तर बसपाने एक जागा जिंकली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 21, 2026 3:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अहिल्यानगर महापालिकेत गटनेते ठरले! राष्ट्रवादीकडून प्रकाश भागानगरे, भाजपाकडून शारदा ढवण यांची निवड








