Ganesh Chaturthi 2025: बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करताना तुम्हीही करताय का चुका? या नियमांचं करा पालन
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
Ganesh Chaturthi 2025: महाराष्ट्रात लाखो घरांमध्ये गणपतीची उत्साहात प्राणप्रतिष्ठा केली जाते. गणपतीची घरात प्राणप्रतिष्ठा करताना विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे.
पुणे: सर्वांची लाडकी देवता असलेल्या गणेशाचं लवकरच आगमन होणार आहे. यावर्षी 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी असून या दिवसापासून पुढील 10 दिवस गणेशाची प्रतिष्ठापणा होईल. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीपासून देशभरात गणेश चतुर्थी उत्सव सुरू होतो. महाराष्ट्रात लाखो घरांमध्ये गणपतीची उत्साहात प्राणप्रतिष्ठा केली जाते. गणपतीची घरात प्राणप्रतिष्ठा करताना विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. संकेत गुरु जंगम यांनी लोकल 18 शी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली.
पंचांगानुसार यंदा गणेश चतुर्थी तिथीची सुरुवात 26 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 54 मिनिटांनी होणार असून, समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून 44 मिनिटांनी होणार आहे. जेव्हा तुम्ही घरात प्राणप्रतिष्ठेसाठी बाजारातून गणेश मूर्ती घेण्यासाठी जाल तेव्हा गणेश मूर्तीच्या सोंडेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. शास्त्रानुसार डाव्या सोंडेच्या गणेश मूर्तीची घरात स्थापना करणे अधिक शुभ मानले जाते.
advertisement
गणेशाचीमूर्ती उभी आहे की आडवी, हे देखील महत्वाचे ठरतं. घरात सिंहासनावर बसलेली व हातात मोदक असलेली मूर्ती स्थापन करावी. गणेशमूर्तींची घरात स्थापना करताना ईशान्य दिशेला करावी. मूर्तीचे तोंड उत्तर दिशेला ठेवावं. घरात गेणशमूर्ती आणल्यानंतर मूर्तीची विधिवत पूजा करून त्यानंतरच प्राणप्रतिष्ठा करावी. दररोज सकाळी स्नान करून सकाळ आणि संध्याकाळ मूर्तीची विधिवत आरती करावी.
advertisement
घरातील वातावरण कसे असावे?
view commentsअसं म्हटलं जातं की, गणेश चतुर्थीच्या दिवशी पार्वतीपुत्र गणेश पृथ्वीवर येतात आणि पुढील 10 दिवस आपल्या भक्तांना सेवा आणि भक्ती करण्याची संधी देतात. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी घरात गणपती मूर्तीची स्थापना केल्यानंतर 10 दिवस घरातील वातावरण हे शांत आणि पवित्र ठेवावे. घरातील सदस्यांकडून भांडण किंवा चिडचिड होणार नाही याची काळजी घ्यावी.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 24, 2025 3:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ganesh Chaturthi 2025: बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करताना तुम्हीही करताय का चुका? या नियमांचं करा पालन

