Ganeshotsav 2025: घरात गर्भवती स्त्री असताना गणपती विसर्जन करावं का? शास्त्र काय सांगतं?

Last Updated:

Ganeshotsav 2025: गणेशोत्सव म्हटलं की रुढी, परंपरा आणि श्रद्धा यांचा मिलाफ डोळ्यासमोर उभा राहतो. कुटुंबात गर्भवती स्त्री असेल तर गणपतीची मूर्ती विसर्जन न करता वर्षभर घरात ठेवली जाते.

+
Ganeshotsav

Ganeshotsav 2025: घरात गर्भवती स्त्री असताना गणपती विसर्जन करावं का? शास्त्र काय सांगतं?

पुणे: महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सव म्हटलं की रुढी, परंपरा आणि श्रद्धा यांचा मिलाफ डोळ्यासमोर उभा राहतो. अनेक परंपरांना शास्त्रीय आधार असतो, तर काही परंपरा फक्त लोकश्रद्धेमुळे आजही टिकून आहेत. अशाच परंपरांपैकी एक म्हणजे जर कुटुंबात गर्भवती स्त्री असेल तर गणपतीची मूर्ती विसर्जन न करता ती मूर्ती वर्षभर घरात ठेवली जाते. पण खरोखरच गणपती बाप्पाची मूर्ती अशा परिस्थितीत घरात ठेवायची असते का? की हा फक्त लोकांचा गैरसमज आहे? या रुढी परंपरेविषयी ज्योतिषतज्ज्ञ शंकर पाटील यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
ज्योतिषी शंकर पाटील सांगतात की, “गर्भवती महिलेचा आणि गणपतीचा काहीही संबंध नाही. घरामध्ये गर्भवती महिला असतानाही गणपती विसर्जन करावे. अशा वेळेस विसर्जन न करण्याची प्रथा चुकीची आहे. ही प्राणप्रतिष्ठा करून बसविलेली मूर्ती उत्तरपूजा करून देव्हाऱ्यातून खाली काढतात आणि तिचे पाण्यात विसर्जन करण्यात यावे. चुकीची रुढी परंपरा पुढे नेऊ नये.”
advertisement
या परंपरा फक्त गैरसमजातून...
गणपती उत्सवात अनेक परंपरा पाळल्या जातात. मात्र, काही परंपरा केवळ गैरसमजातून आजतागायत टिकून आहेत. जसं की घरात गर्भवती स्त्री असेल तर विसर्जन करू नये, मूर्ती वर्षभर घरात ठेवावी, नदी-नाल्यात मूर्ती विसर्जन करावी, विसर्जनानंतर पुन्हा दुसरी मूर्ती ठेवावी किंवा दिखाव्यासाठी महागडे दागिने चढवावेत. तज्ज्ञांच्या मते, “या परंपरांना कुठलाही शास्त्रीय आधार नाही. गणेशोत्सवाचा खरा संदेश भक्ती, साधेपणा आणि निसर्गाशी समतोल साधणं हाच आहे.”
advertisement
दरम्यान, ज्योतिषतज्ज्ञांच्या मतानुसार, आपण देखील या परंपरांऐवजी शुद्ध भक्तीला महत्त्व द्यावं आणि गणेशोत्सवाचा आनंद घ्यावा.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ganeshotsav 2025: घरात गर्भवती स्त्री असताना गणपती विसर्जन करावं का? शास्त्र काय सांगतं?
Next Article
advertisement
Satej Patil : सतेज पाटलांना विरोधी पक्षनेते पद मिळू नये धडपड? प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन
प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..
  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

View All
advertisement