Jalgaon: 'दिपाली सारखी भांडायची, सोडून जायची' गुढीपाडव्याला घरात नितीनने जे केलं ते पाहून पोलीसही हादरले
- Published by:Sachin S
Last Updated:
मागील चार वर्षापासून त्याचे पत्नी दिपाली सोबत वाद सुरू होते. ते दोघं एकमेकापासून बऱ्याच वेळा विभक्त राहिलेले आहेत. पत्नी दिपाली ही बऱ्याचदा घरून निघून जायची.
विजय वाघमारे, प्रतिनिधी
जळगाव: माणसाच्या डोक्यात जर संशयाच्या भुताने घर केलं तर काय घडेल याचा नेम नसतो. अशीच एक मन सुन्न करणाारी जळगावमध्ये घडली आहे. ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती हा पोलीस स्टेशनला हजर झाला आणि 'दिपालीचा खून केला, मला अटक करा' असं सांगून शरण आला. ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगावच्या निमखेडी शिवारात ही घटना घडली आहे. दिपाली नितीन सोनवणे असं मयत महिलेचं नाव आआहे. तर नितीन सोनवणे असं आरोपीचं नाव आहे. निमखेडी शिवारात नितीन कोळी याने आज त्याची पत्नी दिपालीच्या डोक्यावर विटा आणि पोटात विळा मारून निर्घृण हत्या केली. दुपारी साधारण साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. हत्या केल्यानंतर नितीन स्वतः जळगाव तालुका पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली देत पोलिसांना सगळ्या घटनाक्रम सांगितला.
advertisement
नेमकं काय घडलं?
नितीन विजय सोनवणे हा आरोपी मयत दिपाली सोनवणे हिचा पती असून दोन मुलं व एक मुलगी आणि अंध आईसोबत निमखेडी गावात राहत होता. हातमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या नितीन सोनवणे यांचे पत्नीशी काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. नितीनला दिपालीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे मागील ४ वर्षांपासून दोघांमध्ये खटके उडत होते. आज दुपारी पुन्हा वाद उफाळून आला. दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. दोघांमध्ये झटापट झाली, संतापाच्या भरात नितीनने लोखंडी विळ्याने पत्नी दिपालीच्या मानेवर आणि पोटावर वार करून तिची हत्या केली.
advertisement
दिपाली घरातून निघून जायची
पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी नितीन सोनवणे हा स्वतःहून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी दिपाली ही घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. संशयित आरोपी नितीन याने पोलिसांना सांगितलं की, मागील चार वर्षापासून त्याचे पत्नी दिपाली सोबत वाद सुरू होते. ते दोघं एकमेकापासून बऱ्याच वेळा विभक्त राहिलेले आहेत. पत्नी दिपाली ही बऱ्याचदा घरून निघून जायची. दोघांमध्ये नेहमीच वाद व्हायचे आणि या वादातूनच नितीनने दिपालीचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
advertisement
एकीकडे गुढीपाडवा अर्थात मराठी नवीन वर्षाचे स्वागत होत असताना दुसरीकडे मात्र जळगाव या घटनेमुळे हादरून गेले. नितीन आणि दीपालीच्या पश्चात दोन मुलं आणि एक मुलगी आहे तर नितीनची आई वयोवृद्ध असून एका डोळ्याने अधू असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर नितीन आणि दिपालीची तिघ मुलं आता अनाथ झाली असून या संपूर्ण घटनेत त्यांचा दोष काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून या घटनेमुळे समाजमन मात्र सुन्न झालं आहे.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Mar 19, 2026 10:32 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon: 'दिपाली सारखी भांडायची, सोडून जायची' गुढीपाडव्याला घरात नितीनने जे केलं ते पाहून पोलीसही हादरले







