बँकॉक-पुणे विमानातून ७५ लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त, वॉशिरूममध्ये लपवला होता पण...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
पुणे परिक्षेत्राच्या एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी तीन मार्च रोजी ही कारवाई केली.
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : बँकॉकहून पुण्यात आलेल्या विमानाच्या स्वच्छतागृहात लपवून ठेवलेला सुमारे ७५ लाख रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त करण्यात आला. या कारवाईत ७४५ ग्रॅम अमली पदार्थ हस्तगत केला असून, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
पुणे परिक्षेत्राच्या एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी तीन मार्च रोजी ही कारवाई केली. एअर इंडियाच्या बँकॉक-पुणे विमानाच्या स्वच्छतागृहातील टिश्यू कॅबिनेटमध्ये पिवळ्या रंगाचे दोन पाकिटे आढळून आली. तपासणी केली असता, त्या खाद्यपदार्थांच्या पाकिटांमध्ये व्हॅक्युम सीलबंद आठ पाकिटांममध्ये हायड्रोपोनिक गांजा आढळला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
हा हायड्रोपोनिक गांजा विमानात कोणी आणि कशा पद्धतीने लपवून ठेवला, याचा शोध घेतला जात आहे. अशा तस्करीविरोधात संशयास्पद हालचाली आढळल्यास नागरिकांनीही संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी, असे आवाहन एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
advertisement
मुंबई विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई
कस्टमच्या अधिकाऱ्यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई करत अमली पदार्थ आणि परकीय चलनासह कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्पॉट आणि APIS प्रोफाइलिंगच्या आधारे करण्यात आलेल्या तपासात एकूण ८ हायड्रोपोनिक गांजाचे गुन्हे नोंदविण्यात आले. बँकॉकहून मुंबईत आलेल्या ९ प्रवाशांकडून सुमारे ४४.२९२ किलो संशयित हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारात या गांजाची अंदाजे किंमत तब्बल ४४.२९२ कोटी रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 04, 2026 9:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बँकॉक-पुणे विमानातून ७५ लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त, वॉशिरूममध्ये लपवला होता पण...








