नवा AC घेताय? घाई नको, नाहीतर येईल 'शॉक' देणारं वीज बिल, खरेदीपूर्वी 'या' 4 गोष्टी नक्की तपासा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
उन्हाळा वाढला की अनेकांच्या मनात 'नवा एसी' (Air Conditioner) घेण्याचा विचार घोळू लागतो. पण थांबा.... बाजारात गेल्यावर सेल्समनच्या जाळ्यात अडकून कोणताही मॉडेल उचलून घरी आणू नका.
मार्च महिना संपत आला की सूर्याचा पारा चढायला लागतो आणि घामाच्या धारा सुरू होतात. अशा वेळी घरात शिरताच मिळणारी गारवा देणारी झुळूक म्हणजे सुखद अनुभव असतो. त्यामुळेच उन्हाळा वाढला की अनेकांच्या मनात 'नवा एसी' (Air Conditioner) घेण्याचा विचार घोळू लागतो. पण थांबा.... बाजारात गेल्यावर सेल्समनच्या जाळ्यात अडकून कोणताही मॉडेल उचलून घरी आणू नका.
advertisement
advertisement
1. 'टन'चं गणित: तुमच्या खोलीचा आकार किती?एसी खरेदी करताना होणारी सर्वात मोठी चूक म्हणजे चुकीच्या क्षमतेचा (Tonnage) एसी निवडणे.छोट्या खोलीसाठी मोठा एसी: जर तुमची खोली छोटी असेल आणि तुम्ही 2 टनचा एसी लावला, तर वीज उगाचच वाया जाईल.मोठ्या खोलीसाठी छोटा एसी: याउलट, मोठी खोली आणि कमी टनचा एसी असेल, तर कॉम्प्रेसरवर ताण येईल आणि खोली थंड करण्यासाठी मशीन सतत चालू राहील.तुमच्या खोलीचं क्षेत्रफळ, छताची उंची आणि खोलीत किती ऊन येतं, यानुसार 1 टन, 1.5 टन किंवा 2 टन यापैकी योग्य निवड करा.
advertisement
2. 'स्टार रेटिंग'कडे दुर्लक्ष म्हणजे खिशाला फटकाAC वरील स्टिकर्सवर तुम्ही 1 ते 5 स्टार पाहिले असतील. हे फक्त डिझाईन नाही, तर ती वीज बचतीची पावती आहे. 5-स्टार एसी सुरुवातीला महाग वाटू शकतो, पण तो वीज अत्यंत कमी वापरतो. जर तुम्ही फक्त स्वस्त मिळतोय म्हणून 2 किंवा 3 स्टार एसी घेतला, तर दर महिन्याला येणारं जास्तीचं बिल त्या फरकापेक्षा कित्येक पटीने जास्त असेल.
advertisement
3. इन्व्हर्टर की नॉन-इन्व्हर्टर? संभ्रम दूर कराआजकल इन्व्हर्टर एसी (Inverter AC) जास्त लोकप्रिय आहेत आणि त्याचं कारणही तसंच आहे. इन्व्हर्टर एसी खोलीच्या तापमानानुसार कॉम्प्रेसरची गती कमी-जास्त करतो. यामुळे कूलिंग स्थिर राहते आणि विजेची मोठी बचत होते. नॉन-इन्व्हर्टर एसी वारंवार चालू-बंद होतो, ज्यामुळे विजेचा वापर वाढतो. लांबचा विचार केला तर इन्व्हर्टर एसी नेहमीच फायदेशीर ठरतो.
advertisement
4. इन्स्टॉलेशन आणि मेंटेनन्स: विसरून चालणार नाहीएसी चांगला असला तरी त्याचं 'इंस्टॉलेशन' कसं केलंय यावर त्याचं आयुष्य अवलंबून असतं. जर 'आउटडोअर युनिट' थेट उन्हात ठेवलं, तर त्याला हवा थंड करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल. वेळच्या वेळी फिल्टर्सची स्वच्छता न केल्यास कूलिंग कमी होते आणि वीज बिल वाढते.त्यामुळे अनुभवी तंत्रज्ञाकडूनच एसी बसवून घ्या आणि दर मोसमात त्याची सर्व्हिसिंग करायला विसरू नका.









