advertisement

'वैमानिकाचा निरोप आला तर मला जावं लागतं' अजित पवारांचे ते शब्द, डोळ्यात पाणी आणणारा तो VIDEO व्हायरल

Last Updated:

अजित पवार हे सांगलीमध्ये मिरजेत महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारानिमित्त आले होते. त्यावेळी पत्रकाराशी संवाद साधला होता तेव्हा त्यांनी...

News18
News18
सांगली: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज अकाली निधन झालं. बारामतीत येत असताना विमानतळाजवळ त्यांच्या विमान क्रॅश झालं. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. अजितदादांच्या एकाली एक्झिटमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अशातच अजितदादांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. 'वैमानिकाचा निरोप आल्यानंतर जावं लागतं' असं या व्हिडीओत म्हणत होते. त्यांचे हे शब्द ऐकून कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहे.
अलीकडे रााज्यातील महापालिका निवडणुकीची निवडणूक पार पडली. अजित पवार यांनी राज्यभरात पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वत्र सभा आणि रॅली घेतल्या होत्या.  अजित पवार हे सांगलीमध्ये मिरजेत महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारानिमित्त आले होते.
प्रचारसभा आटोपल्यानंतर अजितदादा हे पुढील कार्यक्रमाला निघाले होते. प्रसारमाध्यमांनी त्यांना घेराव घातला. यावेळी पत्रकारांशी नेहमी सारखा संवाद साधत होते. "काही जण नाराज झाले आहे, कारण मला जाणे गरजेचं होतं, कारण, वैमानिकाचा निरोप आला तर मला जावं लागतं.' असं ते या व्हिडीओमध्ये म्हणाले होते. पण, आज बारामतीत जात असताना त्याच अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला.
advertisement
या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानाचे पायलट आणि फ्लाईट अटेंडंट यांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या विमानाचे वैमानिक हे सुमित कपूर आणि संभवी पाठक होते. तर फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी होती. पिंकी माळी या मुंबईतील वरळीतील रहिवाशी आणि राष्ट्रवादी माजी तालुका अध्यक्ष शिवकुमार माळी यांची मुलगी होती.  पिंकी माळी हिचा देखील विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पिंकी देखील अजित पवार यांच्या सोबत विमानामध्ये होती.
advertisement
अपघात नेमका कसा घडला? 
अजित पवारांच्या विमानाने सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी मुंबईतून टेक ऑफ केलं होतं. हे विमान ४० मिनिटांत बारामती विमानतळाजवळ पोहोचलं. यावेळी लँडिंग करत असताना अखेरच्या क्षणी अनर्थ घडला. पायलटने सुरक्षित लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना अपयश आलं. समोरील दृश्यमानता कमी झाल्यामुळे विमान उतरवण्यास अडथळा आला होता. पहिला प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. त्यानंतर दुसऱ्यांदा प्रयत्न केला होता. पण, अचानक विमानामध्ये बिघाड झाला होता. विमानात बिघाड झाल्यामुळे पायलटने मेडे मेडे असा कॉल दिला होता. काही कळायच्या आता १०० फूट उंचावरून विमान हे विमानतळाच्या धावपट्टीच्या अलीकडे कोसळलं.
advertisement
विमान अपघात मृतांची नाव
1. उपमुख्यमंत्री अजित पवार
2. मुंबई पीएसओ HC विदीप जाधव
3. पायलट कॅप्टन सुमित कपूर
4. कॅप्टन संभवी पाठक
पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'वैमानिकाचा निरोप आला तर मला जावं लागतं' अजित पवारांचे ते शब्द, डोळ्यात पाणी आणणारा तो VIDEO व्हायरल
Next Article
advertisement
Dharashiv ZP Election: आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन वाढलं
आणखी एका पुतण्याकडून काकाला चॅलेंज, थेट भाजपसोबत हातमिळवणी, शिंदे गटाचं टेन्शन व
  • महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'काका विरुद्ध पुतण्या' असा संघर्ष नवा राहिलेला न

  • आता याच संघर्षाची ठिणगी शिवसेना शिंदे गटात पडली आहे.

  • धाराशिवच्या परंडा विधानसभा मतदारसंघात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

View All
advertisement