Indigo Airlines: इंडिगो एअरलाईन्सची विमानसेवा पूर्वपदावर, मुंबई- बेंगळुरू सेवा केव्हापासून सुरू होणार?

Last Updated:

इंडिगो एअरलाईन्स आपली सेवा पूर्ववत करताना पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील विमानसेवा आता पूर्ववत होताना दिसत आहे.

इंडिगो अपडेट
इंडिगो अपडेट
इंडिगो एअरलाईन्सच्या (Indigo Airlines) बिघडलेल्या वेळापत्रकाचा देशातील हवाई प्रवासावर गंभीर परिणाम होत आहे. इंडिगो एअरलाईन्सने या वर्षातील हिवाळ्यातील काही स्पेशल विमानसेवांची घोषणा ऑक्टोबरमध्ये केली होती. त्यामुळे देशभरातील विमानसेवांना मोठा ब्रेक लागला होता. नोव्हेंबर महिन्यात पाच दिवस अनेक सेवा रद्द करण्यात आल्या होत्या, तर डिसेंबरमध्ये कंपनीच्या सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्याने देशभरातील हवाई सेवांवर मोठा परिणाम झाला. याचा फटका प्रत्येक विमानाला बसला होता.
आता इंडिगो एअरलाईन्स आपली सेवा पूर्ववत करताना पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील विमानसेवा आता पूर्ववत होताना दिसत आहे. सायंकाळचे स्थगित केलेले विमान 14 डिसेंबरपासून पूर्ववत केले जाणार आहे. आठवड्यातून तीन दिवस असणारी बेंगळुरू सेवा 16 डिसेंबरपासून पुन्हा सुरू केली जाणार आहे. यामुळे आता छत्रपती संभाजीनगर बेंगळुरू विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. हैदराबादसाठी असलेली दुपारच्या सत्रातील विमानसेवा 15 ते 31 डिसेंबर या तारखेदरम्यान स्थगित केली जाणार आहे.
advertisement
शिवाय, हैदराबादसाठीची सकाळची नियमित सेवा एका 78 आसनी एटीआर विमानाद्वारे सुरू राहणार आहे. आता 1 जानेवारी 2026 पासून हिवाळी सत्रातील टाईम टेबल अंमलबजावणी पूर्ण क्षमतेने सुरू केली जाईल, असे जाहीर करण्यात आले आहे. चिकलठाणा विमानतळावरून मुंबई (१), नवी दिल्ली, हैदराबाद (१) आणि गोवा (आठवड्यातून ३ दिवस) या तीन विमानसेवा सुरू होणार आहे.
advertisement
नोव्हेंबरमध्ये रद्द झालेल्या इंडिगो सेवा
1 नोव्हेंबर रोजी, रात्री 09:15 वाजता छत्रपती संभाजीनगरवरून मुंबईचे विमान रद्द.
3 नोव्हेंबर रोजी, सकाळी 07:50 वा. छत्रपती संभाजीनगरहून मुंबईला जाणारे विमान रद्द.
7 नोव्हेंबर रोजी, मुंबईहून सायंकाळी येणारे आणि रात्री 09:15 वाजता मुंबईला परत जाणारे दोन विमान सेवा रद्द झाल्या आहेत.
7 नोव्हेंबर रोजी, दिल्लीहून सायंकाळी 04:55 वाजता छत्रपती संभाजीनगरला येणारे आणि परत रात्री 07:15 वाजता दिल्लीला परत जाणारे दोन विमान सेवा रद्द झाल्या आहेत.
advertisement
11 नोव्हेंबर रोजी, गोवा येथून दुपारी 02:05 वाजता येणारे आणि दुपारी 04:45 वाजता गोव्याला परत जाणारे दोन विमान सेवा रद्द झाल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Indigo Airlines: इंडिगो एअरलाईन्सची विमानसेवा पूर्वपदावर, मुंबई- बेंगळुरू सेवा केव्हापासून सुरू होणार?
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement