advertisement

Jalgaon Accident: वाहनांची समोरासमोर धडक, अपघातात प्रसिद्ध डॉक्टरांच्या लेकीचा मृत्यू

Last Updated:

जळगावच्या फैजपूर-अमोदा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात प्रसिद्ध डॉक्टरांच्या लेकीचा मृत्यू झाला आहे.

जळगाव अपघात
जळगाव अपघात
इम्तियाज अहमद, जळगाव : फैजपूर-अमोदा मार्गावर दोन अॅपे रिक्षांची समोरासमोर जोरदार धडक होऊन मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत एका तरुणीचा मृत्यू झाला असून काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. आदिती सोपान खडसे असे मृत तरुणीचे नाव आहे.
सिक्स सीटर प्रवासी रिक्षा अमोदा येथून फैजपूरकडे येत होती. तर मालवाहू रिक्षा फैजपूरकडून अमोदा दिशेने जात होती. दोन्ही रिक्षांची समोरासमोर जोरदार धडक झाली. प्रवासी रिक्षा (क्रमांक MH 19 CW 3590) आणि मालवाहू रिक्षा (क्रमांक MH 19 7064) यामध्ये हा अपघात झाला.
या अपघातात सावदा येथील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. सोपान खडसे यांची कन्या आदिती सोपान खडसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त इतर प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या असून त्यांना तातडीने फैजपूर पोलिसांनी रुग्णवाहिकेद्वारे स्थानिक रुग्णालयात हलवले आहे.
advertisement
दरम्यान, घटनास्थळी फैजपूर पोलीस दाखल झाले असून अपघाताच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी पुढील तपास फैजपूर पोलीस करीत आहेत. अदिती सोपान खडसे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon Accident: वाहनांची समोरासमोर धडक, अपघातात प्रसिद्ध डॉक्टरांच्या लेकीचा मृत्यू
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement