जळगावात मध्यरात्री थरार, अवैध दारू विक्रेत्याकडून तुफान गोळीबार, दोघे गंभीर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Gun Firing At Jalgaon: जळगाव शहरातील एमआयडी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रविवारी मध्यरात्री उशिरा एका दारु विक्रेत्याने पाच ते सहा गोळ्या झाडल्या आहेत.
विजय वाघमारे, प्रतिनिधी जळगाव: जळगाव शहरातील एमआयडी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रविवारी मध्यरात्री उशिरा एका दारु विक्रेत्याने पाच ते सहा गोळ्या झाडल्या आहेत. या गोळीबारात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. रात्री उशिरा घडलेल्या या गोळीबारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गोळीबार करणारा आरोपी पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. राजन शेख रफिउल्ला आणि अहमद फिरोज शेख अशी गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या दोघांची नावं आहेत. दोघांवर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर रात्री उशिरा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. ही घटना एमआयडीसीच्या जी सेक्टरमध्ये घडली.
advertisement
मध्यरात्री नक्की काय घडलं?
जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील जी सेक्टरमध्ये रात्री उशिरा झालेल्या गोळीबाराने परिसरात खळबळ उडाली. प्लास्टिकचे दाणे बनविणाऱ्या कंपनीबाहेर अवैध दारू विक्रेत्याने कामगारांवर पाच ते सहा गोळ्या झाडल्या. या घटनेत राजन शेख रफिउल्ला आणि अहमद फिरोज शेख हे दोन तरुण कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, सरफू शेख हा कामगार कंपनीत नाईट ड्युटीसाठी जात होता. यावेळी दारू विक्रेता एका व्यक्तीला मारहाण करत असल्याचं त्याला दिसून आलं. त्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता दारू विक्रेत्याने त्यालाही मारहाण केली. सरफूने मदतीसाठी आपल्या भावांना बोलावल्यावर दारू विक्रेत्याने एका महिलेच्या मदतीने गावठी बंदुकीतून बेछूट गोळीबार केला. त्याने पाच ते सहा गोळ्या झाडल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
November 03, 2025 12:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जळगावात मध्यरात्री थरार, अवैध दारू विक्रेत्याकडून तुफान गोळीबार, दोघे गंभीर


