नशिराबादमध्ये महायुतीत मोठी फूट,अर्ज भरण्याच्या एक दिवस अगोदर मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचा मोठा निर्णय

Last Updated:

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असून महायुतीतील नाराजीनाट्य समोर आले आहे.

News18
News18
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी
जळगाव :नशिराबाद नगरपरिषदेत आज मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. भाजप–शिवसेना शिंदे गटासोबत महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने अखेर महायुतीपासून दुरावत स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या आदेशानंतर राष्ट्रवादीने अधिकृतरित्या स्पष्ट केले की, नशिराबाद नगरपरिषदेची निवडणूक पक्ष स्वबळावर लढवणार आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असून महायुतीतील नाराजीनाट्य समोर आले आहे.
advertisement
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून भाजप आणि शिवसेनेसोबत जागावाटपाच्या चर्चांना वेग आला होता. महायुतीकडून काही जागांवर समाधानकारक तडजोड न झाल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत होती.या पार्श्वभूमीवर जिल्हा नेतृत्वाने महायुतीतील चर्चांना पूर्णविराम देत ऐनवेळी ‘स्वबळाचा’ निर्णय घेतला. निवडणूक अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्याने राष्ट्रवादीच्या सर्व संभाव्य उमेदवारांनी तातडीने अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. शहरातील पक्ष कार्यालयात दिवसभर बैठकांची लगबग दिसून आली.
advertisement

राजकीय समीकरण  बदलण्याची शक्यता

राष्ट्रवादी उमेदवारांच्या अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाने स्वतंत्र पथकही तयार केले आहे.या निर्णयामुळे नशिराबादमध्ये आता थेट महायुतीतील भाजप–शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट असा सामना रंगणार आहे. भाजप–शिवसेनेने संयुक्तपणे निवडणूक लढवण्यासाठी तयारी केली असताना राष्ट्रवादीच्या या अचानक निर्णयाने त्यांचे गणित मोठ्या प्रमाणावर बदलण्याची शक्यता आहे.
advertisement

स्वबळावर उतरण्याचा निर्णय

राष्ट्रवादीने अलगद पद्धतीने महायुतीपासून बाजू काढत स्वतंत्र लढण्याची घोषणा केल्यानंतर शहरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे ढवळून निघाली आहेत. गेल्या काही वर्षांत महायुती म्हणून एकत्र लढण्याचा दावा करणाऱ्या नेत्यांच्या वक्तव्यांनाही या निर्णयाने मोठा धक्का बसला आहे. नशिराबादमध्ये पक्षाकडे चांगली जनाधार असलेली टीम आहे. जागावाटपात समाधानकारक समन्वय न झाल्याने कार्यकर्त्यांच्या मतांचा आदर करत स्वबळावर उतरण्याचा निर्णय घेण्यात आला.
advertisement

नशिराबाद नगरपरिषदेत वातावरण तापले

नशिराबाद नगरपरिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत अवघ्या एका दिवसावर अर्ज दाखल करण्याची मुदत येऊन ठेपल्याने राजकीय तापमान चांगलेच तापले आहे. शहरातील 26,872 मतदारांना लक्षात घेत विविध पक्ष व अपक्ष उमेदवारांकडून मोठ्या संख्येने अर्ज दाखल करण्याची चढाओढ सुरू झाली आहे. आजपर्यंत नशिराबाद नगरपरिषदेसाठी एकूण 207 ऑनलाइन उमेदवारी अर्ज नगरसेवक पदासाठी, तर 22 ऑनलाइन उमेदवारी अर्ज नगराध्यक्ष पदासाठी दाखल झाले आहेत. याशिवाय 71 नगरसेवक पदासाठी, आणि नगराध्यक्ष पदासाठी एक उमेदवाराने ऑफलाइन अर्ज नगरपरिषद कार्यालयात जमा केला आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून सर्व पक्षांनी आपापल्या संभाव्य उमेदवारांना अर्ज दाखल करण्यास अंतिम सूचना दिल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नशिराबादमध्ये महायुतीत मोठी फूट,अर्ज भरण्याच्या एक दिवस अगोदर मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचा मोठा निर्णय
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement