advertisement

नव्या कारसाठी शोरुमला गेले असताना रस्त्यातच मृत्यूनं गाठलं, आजोबा आणि नातवाचा जागीच जीव गेला

Last Updated:

पाळधी बायपासवरील कढोली फाट्याजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॉलीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

News18
News18
विजय वाघमारे, प्रतिनिधी
जळगाव :  जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळ सोमवारी एक भीषण अपघात घडला. पाळधी बायपासवरील कढोली फाट्याजवळ दुचाकी आणि ट्रॉलीमध्ये झालेल्या जोरदार धडकेत आजोबा आणि त्यांच्या सहा वर्षीय नातवाचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक अपघातात पत्नी गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, नुकतीच खरेदी केलेल्या कारच्या कागदपत्रांच्या कामासाठी जळगावला आलेले देशमुख चुनीलाल राठोड हे पत्नी बेबीबाई राठोड आणि नातू परेश राठोड यांच्यासह दुचाकीने गावाकडे परतत असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रॉलाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. काम आटोपून देशमुख चुनीलाल राठोड हे पत्नी बेबीबाई राठोड आणि नातू परेश यांच्यासह दुचाकीने आपल्या मूळ गावी परतत होते.
advertisement

आजोबा- नातवाचा जागेवर मृत्यू 

दरम्यान, पाळधी बायपासवरील कढोली फाट्याजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॉलीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, दुचाकीचा चक्काचूर झाला. अपघातात चुनीलाल राठोड आणि त्यांचा नातू परेश यांचा जागीच मृत्यू झाला, तर बेबीबाई राठोड या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
advertisement

कारवाईमुळे चालक ताब्यात

अपघातानंतर ट्रॉलीचालक घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, सतर्क नागरिकांच्या मदतीने आणि पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे चालकाला ताब्यात घेण्यात आले. संबंधित ट्रॉला वाहनासह चालक सध्या पाळधी पोलीस ठाण्यात असून पुढील चौकशी सुरू आहे.

जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची एकच गर्दी

या अपघाताची माहिती मिळताच जळगाव जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. कुटुंबावर कोसळलेल्या या दुहेरी आघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, बायपासवरील भरधाव वाहतूक आणि अपघातांच्या वाढत्या घटनांबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. पाळधी पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नव्या कारसाठी शोरुमला गेले असताना रस्त्यातच मृत्यूनं गाठलं, आजोबा आणि नातवाचा जागीच जीव गेला
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement