advertisement

'छातीत गोळी' मारण्याचा इशारा देणाऱ्या आकाशचा शेवट तसाच, 12 गोळ्या झाडून हत्या, दोन दिवसांपूर्वी बनवलेली Reel ठरली हत्येचे कारण?

Last Updated:

Jalgoan Crime Reel : हत्या झालेल्या आकाश मोरे याने दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक स्टेटस व्हिडीओ पोस्ट केला होता. 'छातीत गोळी' मारण्याचा इशारा देणाऱ्या आकाशचा शेवट तसाच झाल्याचं पहायला मिळतंय.

jalgoan crime
jalgoan crime
Jalgoan Crime News : जळगावातून महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. दिवसाढवळ्या मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी एका 26 वर्षीय तरुणावर गावठी कट्ट्याने तब्बल 12 वेळा गोळीबार करत त्याची निर्घृण हत्या केली. आकाश कैलास मोरे असं मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. वाळू व्यवसायातील वादातून ही धक्कादायक घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. अशातच आता मयत आकाशचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरून समोर आला आहे.

सोशल मीडियावर स्टेटस व्हिडीओ

हत्या झालेल्या आकाश मोरे याने दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक स्टेटस व्हिडीओ पोस्ट केला होता. आकाश सोशल मीडियावर अॅक्टिव असल्याने तो सतत व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत होता. अशातच आता 'छातीत गोळी' मारण्याचा इशारा देणाऱ्या आकाशचा शेवट तसाच झाल्याचं पहायला मिळतंय. त्याची रील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
advertisement

रीलमध्ये काय म्हटलंय?

शेठ तुम्ही हवेत गोळ्या मारता आम्ही छातीवर गोळ्या मारतो, कसं रोख आणि ठोक... जिस दिन मारूंगा छातीपर मारूंगा, अशा आशयाची रील आकाशने सोशल मीडियावर शेअर केली होती. तसेच बदला लेने मै देर हो सकती है.. उसे भुलाया नही जा सकता, असं आणखी एक पोस्ट देखील आकाशने केली होती. वेट धमाका होगा, अशी कमेंट देखील त्याने यावेळी केली होती.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Akash More (@_akash__1919)



advertisement

12 गोळ्या झाडल्या

मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारात आकाशच्या शरीरावर अनेक ठिकाणी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्याच्या कपाळावर 1, डोक्यावर 4, पाठीवर 4, छातीवर 1 आणि डोक्याच्या मागे 2 अशा एकूण 12 गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इतक्या गोळ्या लागल्यामुळे आकाशचे शरीर अक्षरशः छिद्रे पडल्यासारखे झाले होते. या हत्येनंतर मारेकरी नीलेश अनिल सोनवणे आणि त्याचा एक अल्पवयीन साथीदार हे दोघे जळगावच्या दिशेने दुचाकीवरून पळून गेले. मात्र, काही वेळानंतर त्यांनी पोलीस चौकीत सरेंडर केलं.
advertisement

वाळू व्यवसायातील वाद

दरम्यान, या थरारक घटनेच्या मुळाशी वाळू व्यवसायातील वाद आणि वर्चस्व संघर्ष असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, सोशल मीडियावरील स्टेटस, रील्स आणि त्यातून निर्माण झालेली वैमनस्ये यांचाही पोलीस सखोल तपास करत आहेत. पोलीस सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल डिटेल्स आणि सोशल मीडिया पोस्ट यांची कसून चौकशी करत आहेत. पाचोरा शहरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
'छातीत गोळी' मारण्याचा इशारा देणाऱ्या आकाशचा शेवट तसाच, 12 गोळ्या झाडून हत्या, दोन दिवसांपूर्वी बनवलेली Reel ठरली हत्येचे कारण?
Next Article
advertisement
Budget Stocks: बजेटपूर्वी मोठा ट्विस्ट, शेअर मार्केटमध्ये खळबळ; बंपर लॉटरी देणारी  सिक्रिट लिस्ट आली समोर, गुंतवणूकदारांनो, पैसे तयार ठेवा
बजेटपूर्वी मोठा ट्विस्ट, शेअर मार्केटमध्ये खळबळ; गुंतवणूकदारांनो, पैसे तयार ठेवा
  • उद्या रविवार पण सुट्टी नाही

  • शेअर्सची सिक्रिट लिस्ट आली समोर

  • उद्यासाठी पैसे आजच तयार ठेवा!

View All
advertisement