Jalna News : DYSPने लाथाडलेल्या आंदोलकांनी सगळंच बाहेर काढलं, कदिम जालना पोलिसांवर खळबळजनक आरोप

Last Updated:

जालना जिल्ह्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा ताफा अडवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकाच्या कमरेत DYSP अनंत कुलकर्णी यांनी फिल्मी स्टाईलने लाथ घातल्याची घटना घडली होती

jalna dysp kick of protester
jalna dysp kick of protester
Jalna News : जालना जिल्ह्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा ताफा अडवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकाच्या कमरेत DYSP अनंत कुलकर्णी यांनी फिल्मी स्टाईलने लाथ घातल्याची घटना घडली होती.या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.त्यानंतर राजकीय वर्तुळात या घटनेवर अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. या घटनेनंतर आता त्या आंदोलकांनी कदिम जालना पोलिसांवर खळबळजनक आरोप केले आहेत.
advertisement

पोलीसांनी पैसे खाल्ले

या प्रकरणातील उपोषणकर्ता गोपाल चौधरी यांनी कदीम जालना पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. माझ्या सासरच्यांनी माझ्या बायकोची दुसरं लग्न लावून दिलं आहे.त्यामुळे त्यांच्याविरोधात कदिम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पण पोलीस पैसे खाऊन गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप गोपाल चौधरी याने केला आहे. तसेच माझ्या बापाला चौकशीला बोलावून मारहाण केली,असा आरोपही त्याने केला आहे.
advertisement
तसेच अख्खी पोलिसांची फौज आमच्या अंगावर येतय. आरोपींना अटक करा आणि कोर्टात हजर करा इतकीच माझी मागणी आहे. आज आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही आत्मदहन करू,असा इशाराही त्यांनी पोलिसांना दिला आहे.
advertisement
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.आरोपींना त्यांनी न्यायालयात हजर करावं आम्ही उपोषण सोडून देऊ आणि आत्मदहन करणार नाही, असे आंदोलक रमेश चौधरी यांनी सांगितले आहे.

DYSP चं स्पष्टीकरण

जालन्यात आत्मदहन करण्याचा प्रयत्न करताना आंदोलकाने महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर रॉकेल टाकल्याने बळाचा वापर केला असल्याचं स्पष्टीकरण DYSP अनंत कुलकर्णी यांनी दिले आहे. पत्नीने दुसरं लग्न केल्यानं पत्नीला आणून देण्याच्या मागणीसाठी गोपाल चौधरी हे मागच्या काही दिवसांपासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. यावेळी पोलिसांनी त्यांची अनेकवेळा समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
advertisement
इतकं करून देखील आज पंकजा मुंडे दौऱ्यात असताना त्यांनी अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर रॉकेल टाकलं म्हणून त्यांना ताब्यात घेण्यासाठी बळाचा वापर केल्याचं पोलीस उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.
advertisement
दरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या गोपाल चौधरीवर पोलिसांनी शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास सूरू आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalna News : DYSPने लाथाडलेल्या आंदोलकांनी सगळंच बाहेर काढलं, कदिम जालना पोलिसांवर खळबळजनक आरोप
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement