मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाला मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा धक्का, बडा नेता सोडणार उद्धव ठाकरेंची साथ
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचा मोठा नेता शिवसेनेत प्रवेश करणार आहे.
जालना, रवी जैस्वाल, प्रतिनिधी : विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता महाविकास आघाडी आणि महायुतीमधील कोणत्या घटक पक्षांच्या वाट्याला किती जागा येणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र दुसरीकडे काही नेते ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करताना देखील दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे.
जालना जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. घनसावंगीतील ठाकरे गटाचे नेते हिकमत उढाण हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. येत्या दहा तारखेला ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेते प्रवेश करणार आहेत. हा विधानसभेच्या तोंडावर ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
हिकमत उढाण यांनी शिवसेनेच्या तिकिटावर घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून दोनदा निवडणूक लढवली आहे. गेल्या निवडणुकीत ते राजेश टोपे यांच्याकडून अवघ्या 3 हजार 409 मतांनी पराभूत झाले होते.
advertisement
यंदाही त्यांनी टोपे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ते 10 तारखेला शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. घनसांवगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील हिकमत उढाण यांच्या साखर कारखान्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असून, तिथेच त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळं टोपे यांच्यासमोर पुन्हा एकदा मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Jalna,Jalna,Maharashtra
First Published :
Oct 08, 2024 11:55 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाला मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा धक्का, बडा नेता सोडणार उद्धव ठाकरेंची साथ










