advertisement

आता तुमच्या जिल्ह्यातच मिळणार मुख्यमंत्री सहाय्यता! रुग्णांची धावपळ थांबणार, पाहा महत्त्वाचं अपडेट

Last Updated:

आता तुमच्या जिल्ह्यातच मिळणार मुख्यमंत्री सहाय्यता! रुग्णांची धावपळ थांबणार, पाहा महत्त्वाचं अपडेट

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष
जालना: मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून अनेक रुग्णांना मदत होत असते. यामुळे आता लोकांना लगेच मदत मिळावी यासाठी आता प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी' कक्ष सुरू करण्यात येणार आहे. याबाबत आता 22 जानेवारी रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. याचा फायदा जालन्यातील गरजू रुग्णांना होणार असून नातेवाईकांची धावपळीतून मुक्तता होणार आहे.
गरजूंना आर्थिक सहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत आहे. या कक्षात सादर झालेल्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाइक मंत्रालयात जातात. आता जिल्ह्यातच कक्ष होणार असल्याने मंत्रालयात जाण्याची गरज राहणार नाही. गेल्या काही वर्षामध्ये वैद्यकीय निधी कक्षाकडे मदत मागणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबई येथे मदत मागण्याची गरज उरणार नाही.
advertisement
पूर्वी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाची मदत मिळण्यासाठी मुंबई येथे पायपीट करावी लागत होती. आता प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री मदत कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसात कक्ष कार्यरत होईल. त्यामुळे नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, सध्या मदत कक्षात अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाईन सुरू आहे. येत्या काळात ती देखील ऑनलाईन होणार आहे. जिल्हास्तरावर स्थापन करण्यात येणारा कक्ष मुख्य कार्यालयाशी जोडला जाईल. यामुळे मदत झटपट मिळणार आहे.
advertisement
जालन्यात लवकरच सुरू होणार कक्ष
मागील वर्षभरात जालना जिल्ह्यातील अनेक रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाकडून आर्थिक मदत मिळालेली आहे. आता जालना जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात देखील मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष सुरू होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना आर्थिक मदत मिळण्यासाठी मुंबईला जाण्याची गरज नाही. शासनाकडून याविषयी निर्णय घेण्यात आला असला तरी अद्याप प्रशासकीय अधिकाऱ्यांना याविषयी सूचना देण्यात आलेल्या नाहीत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
आता तुमच्या जिल्ह्यातच मिळणार मुख्यमंत्री सहाय्यता! रुग्णांची धावपळ थांबणार, पाहा महत्त्वाचं अपडेट
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement