Gold Rate Hike: सोन्याची उच्चांकी झेप, आता 90000 रुपयांचा टप्पा गाठणार! काय आहे कारण?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरांनी उच्चांकी पातळी गाठली आहे. पुढील काळात सोनं 90 हजार रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना: सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. 15 दिवसांपूर्वी 78 ते 79 हजार रुपये प्रति तोळा असलेलं सोनं आता 84 हजार रुपये प्रति तोळा या उच्चांकी दरापर्यंत गेलंय. चांदीच्या दरामध्ये देखील लक्षणीय वाढ झाली असून चांदी 94 हजार 500 रुपये प्रति किलो या दराने विक्री होत आहे. या दोन्ही दरांमध्ये 3 टक्के जीएसटी लावला जात आहे. ऐन लग्नसराईच्या काळात सोने-चांदीच्या दरामध्ये होत असलेल्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. तर मार्च अखेरपर्यंत सोन्याचे दर 90 हजारांचा टप्पा ओलांडतील, अशी शक्यता लोकल18 सोबत बोलताना व्यापाऱ्यांनी व्यक्त केलीये.
advertisement
सोनं-चांदीच्या दरवाढीचं कारण
अमेरिकेमध्ये सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, चीन आणि मेक्सिको या देशांवर 25 टक्के कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णयाचा परिणाम संपूर्ण जगातील सोने आणि चांदीच्या बाजारावर होत आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास सोने आणि चांदी मधील गुंतवणुकीमध्ये वाढत आहे. त्यामुळे सोने आणि चांदी खरेदीकडे सगळ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या भागांमध्ये वाढ होत असल्याचं जालना शहरातील व्यापारी गिरीधर लाल लधानी यांनी सांगितले.
advertisement
मागील दोन आठवड्यांपासून सोने आणि चांदीमध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे. 15 दिवसांनी सोन्याचा भाव 78 हजार 500 ते 19 हजार 500 दरम्यान होता. तोच आता 83 हजार 500 ते 84 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम असा झाला आहे. अमेरिकेने इतर देशांवर वाढवलेला कर हे सगळ्यात मोठं कारण यामागे आहे. सगळ्या जगातील सेंट्रल बँक सोन खरेदी करत आहेत. सोन्याला लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहत असल्याने सोन्याचा भाव वाढतच असल्याचंही सराफा व्यावसायिकांनी सांगितलं.
advertisement
विदेशी मुद्रेमध्ये सोन्याचा भाव सध्या 2800 डॉलर आहे. हळूहळू हाच भाव 3000 डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मार्च अखेर पर्यंत सोन्याचा भाव विदेशी मुद्रेमध्ये 3000 डॉलरपर्यंत पोहोचल्यानंतर भारतामध्ये सोनं 90 हजार रुपये प्रति तोळ्याचा टप्पा पार करेल असं व्यापारी गिरीधर लाल लधानी यांनी सांगितलं.
असे आहेत सोने आणि चांदीचे भाव
4 फेब्रुवारी रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर हा 84 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 76 हजार 500 रुपये प्रति 10 ग्रॅम असा आहे. तर चांदीचा भाव हा 94 हजार 500 रुपये प्रति किलो असा आहे. या दरामध्ये तीन टक्के वस्तू व सेवा कर जोडण्यात येतो.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Feb 04, 2025 3:22 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Gold Rate Hike: सोन्याची उच्चांकी झेप, आता 90000 रुपयांचा टप्पा गाठणार! काय आहे कारण?







