शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! हरभरा बियाणे मिळवण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन, अशी आहे प्रक्रिया
- Reported by:Kale Narayan
- local18
- Published by:Khushalkant Dusane
Last Updated:
important news for farmers - अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान अन्नधान्य पिके सन 2024-25 अंतर्गत रब्बी हंगामामंध्ये पीक प्रात्यक्षिके तसेच प्रमाणित बियाणे वितरण या बाबींचे नियोजन करण्यात आले आहे.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना - कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक सवलती तसेच योजना राबवल्या जातात. अन्न व पोषण सुरक्षा अभियाना अंतर्गत 2024-25 साठी पीक प्रात्यक्षिक तसेच प्रमाणित बियाणे वितरण राबवले जात आहेत. या अंतर्गत प्रात्यक्षिकासाठी शेतकऱ्यांना एक एकरच्या मर्यादित अनुदान तत्वावर बियाणे देण्यात येणार आहे. तर प्रमाणित बियाण्यासाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देय असणार आहे. डीबीटी पोर्टल अंतर्गत शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
advertisement
अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान अन्नधान्य पिके सन 2024-25 अंतर्गत रब्बी हंगामामंध्ये पीक प्रात्यक्षिके तसेच प्रमाणित बियाणे वितरण या बाबींचे नियोजन करण्यात आले आहे. चालु वर्षी हरभरा या पिकासाठी महाडीबीटी प्रणालीद्वारे बियाणे या घटकासाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
advertisement
खव्याच्या दरात 100 रुपयांची वाढ, असे आहेत सध्याचे दर, जालन्याच्या खवा बाजारातून ground report, VIDEO
पीक प्रात्यक्षिके ही बाब शेतकरी गटामार्फत राबविली जाणार आहे. यामध्ये पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्यांला एक एकर मयदित निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला आवश्यक असणाऱ्या बियाण्याचा 2 हेक्टर मर्यादित लाभ देय असणार आहे.
advertisement
या निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडिबीटी पोर्टलवर केलेल्या अर्जातुन ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडिबीटी पोर्टलवर बियाणे, औषधे व खते या टाईल्स अंतर्गत अर्ज करता येणार आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. तरी शेतकऱ्यांसाठी यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
Oct 09, 2024 5:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! हरभरा बियाणे मिळवण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन, अशी आहे प्रक्रिया









