हॉटेलमध्ये आले, जेवण केलं, जाताना दोघांचा रक्तरंजित कांड, जालन्यात मालकाला पाडलं रक्ताच्या थारोळ्यात
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरील एका हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. इथं दोन जणांनी हॉटेल मालकासह एका सहकाऱ्यावर चाकुने वार केले आहेत.
रवी जैस्वाल, प्रतिनिधी जालना: जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरील एका हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. इथं दोन जणांनी जेवणाचं बिल मागितल्याच्या कारणावरून हॉटेल मालकासह एका सहकाऱ्यावर चाकुने वार केले आहेत. या हल्ल्यात दोघेजण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर दुसरा आरोपी फरार आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. ही घटना शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरील 'बिस्मिल्ला' हॉटेलमध्ये घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश मोरे नावाचा व्यक्ती आपल्या एका साथीदारासोबत संभाजीनगर रोडवरील बिस्मिल्ला हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आला होता. जेवण झाल्यानंतर हॉटेल मालक मन्सूर खान आणि त्यांचा सहकारी फरदीन खान यांनी जेवणाचे बिल मागितले. पण अविनाशने बिल देण्यास नकार दिला. याच कारणावरून आरोपी अविनाश मोरे आणि त्याच्या साथीदारासोबत हॉटेल मालकाचा वाद झाला.
advertisement
हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी धारदार चाकूने मन्सूर खान आणि फरदीन खान यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. या घटनेदरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या काहींनी मध्यस्थी करत आरोपींना पकडलं. आणि दोन्ही जखमींना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.
या घटनेदरम्यान, उपस्थित नागरिकांनी धाडस दाखवत एका आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. कदीम जालना पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मुख्य आरोपी अविनाश मोरे याला अटक केली आहे. त्याचा दुसरा साथीदार मात्र फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
Aug 17, 2025 12:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
हॉटेलमध्ये आले, जेवण केलं, जाताना दोघांचा रक्तरंजित कांड, जालन्यात मालकाला पाडलं रक्ताच्या थारोळ्यात









