Ratnagiri News : नववर्षाच्या तोंडावर दु:खाचा डोंगर,मुंबईहून गुहागरला गेलेले कुटुंब समुद्रात बुडालं, नेमकं काय घडलं?

Last Updated:

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये पर्यटनासाठी गेलेले एक कुटुंब समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक जीवरक्षकांनी तत्काळ तत्परता दाखवत माय लेकाचे प्राण वाचवले आहेत. तर एका व्यक्तीचा या घटनेत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

ratnagiri news
ratnagiri news
Ratnagiri News : राजेश जाधव, प्रतिनिधी, रत्नागिरी (गुहागर) : नाताळ आणि नववर्षाच्या निमित्तान सध्या अनेक पर्यटन पर्यटनाला निघाले आहेत. या पर्यटना दरम्यान काही दु:खत घटना देखील घडत आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये पर्यटनासाठी गेलेले मुंबईचं एक कुटुंब समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक जीवरक्षकांनी तत्काळ तत्परता दाखवत माय लेकाचे प्राण वाचवले आहेत. पण या घटनेत महिलेच्या नवऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अमोल मुथ्या असे या 42 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. या घटनेने मिथ्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
खरं तर नाताळ आणि नववर्षानिमित्त मिळालेल्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी अनेक पर्यटकांनी कोकणाची वाट धरली आहे. अशाच प्रकारे मुंबईच्या पवई परिसरात राहणारे मिथ्या कुटुंबिय पर्यटनासाठी कोकणात दाखल झाले होते. यावेळी गुहागरच्या समुद्रात पोहण्याचा आनंद घेत असताना मिथ्या कुटुंबातील तिघे जण बुडाल्याची घटना घडली होती.आज दुपारी 1 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक जीवरक्षकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य राबवले होते. या बचावकार्याच्या माध्यमातून एका महिलेला आणि तिच्या 14 वर्षाच्या मुलाला वाचवण्यात यश आले आहे. तर अथक परिश्रमानंतरही अमोलला वाचण्यात स्थानिकांसह पोलिसांना अपयश आले. त्यामुळे 42 वर्षीय अमोल मुथ्या यांचा या घटनेत दुदैवी मृत्यू झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ratnagiri News : नववर्षाच्या तोंडावर दु:खाचा डोंगर,मुंबईहून गुहागरला गेलेले कुटुंब समुद्रात बुडालं, नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement