शेतात कामाची लगबग, आकाशातून अचाकन कोसळलं विचित्र उपकरण..., जालन्यात खळबळ!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Jalna News: जालन्यातील भोकरदनमध्ये एका शेतात अचानक अज्ञात उपकरण आकाशातून कोसळलं. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
जालना: जिल्ह्यातील भोकरदनमध्ये अज्ञात उपकरण शेतात कोसळल्याने एकच खळबळ उडाली. आकाशातून पडलेले हे उपकरण नक्की काय आहे? याबाबत नागरिकांनी तर्कवितर्क लढवले. परंतु, याबाबत अधिकाऱ्यांना पाचारण केले असता हे हवामानशास्त्र संबंधित उपकरण असल्याचे समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भोकरदन तालुक्यातील रेलगाव येथे शेतकरी सत्यवान मिसाळ यांच्या शेतात एक अज्ञात उपकरण आकाशातून कोसळल्याने गावात मोठी खळबळ उडाली. विचित्र आकाराचे उपकरण, त्याला जोडलेली पांढरी रबरासारखी पिशवी व लांबलचक दोरी आणि संभ्रम निर्माण झाला. ग्रामस्थांनी ही माहिती प्रशासनाला दिली असता, तपास केल्यानंतर हे निरीक्षणासाठी वापरण्यात येत असलेले उपकरण असल्याचे स्पष्ट झाले.
advertisement
घटनास्थळी जमलेल्या ग्रामस्थांना हे कोणते संशयास्पद किंवा धोकादायक साहित्य तर नाही ना, असा प्रश्न पडला. काहींना ते ड्रोनचे अवशेष, तर काहींना स्फोटक यंत्रासारखे वाटल्याने गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. हवामान निरीक्षणासाठी वापरले जाणारे हे यंत्र मोठ्या बलूनसोबत आकाशात सोडले जाते. बलून वातावरणाच्या उंच थरांमध्ये फुटल्यावर हे हलके उपकरण वाऱ्याच्या दिशेने शेतात येऊन पडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांचा संभ्रम दूर झाला.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
December 04, 2025 1:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
शेतात कामाची लगबग, आकाशातून अचाकन कोसळलं विचित्र उपकरण..., जालन्यात खळबळ!


