वेळ नोट करुन ठेवा नाहीतर म्हणाल सांगितलंच नाही! वंदे भारत आता नांदेडमधून सुटणार

Last Updated:

Vande Bharat Train: मुंबई ते छत्रपती संभाजीनगर वंदे भारत रेल्वे आता जालन्यातून सुटणार आहे. त्यामुळे संभाजीनगरकरांचे वेळेचे गणित बिघडणार आहे.

jalna vande bharat train वेळ नोट करुन ठेवा नाहीतर म्हणाल सांगितलंच नाही! वंदे भारत आता जालन्यातून सुटणार
jalna vande bharat train वेळ नोट करुन ठेवा नाहीतर म्हणाल सांगितलंच नाही! वंदे भारत आता जालन्यातून सुटणार
जालना: वंदे भारत एक्स्प्रेसचा मार्ग आता नांदेडपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, यामुळे छत्रपती संभाजीनगरकरांचे मुंबई प्रवासाचे नियोजन कोलमडणार आहे. पूर्वी सकाळी 5:45 वाजता सुटणारी वंदे भारत आता सकाळी 8:13 वाजता निघेल आणि दुपारी 2:25 वाजता मुंबईत पोहोचेल. त्यामुळे ही जलदगती रेल्वे छत्रपती संभाजीनगरकरांसाठी आता 'नसून अडचण, असून गैरसोय' ठरत आहे.
जानेवारी 2024 मध्ये वंदे भारतच्या रूपाने मिळालेली सुपरफास्ट एक्स्प्रेस ही जालना आणि छत्रपती संभाजीनगरसाठी पर्वणी ठरली होती. ही ट्रेन 'हब टू हब' कनेक्शनसाठी डिझाइन केलेली आहे, जी मोठ्या शहरांना जलद जोडते. विशेषतः छत्रपती संभाजीनगरसारख्या औद्योगिक आणि ऐतिहासिक शहरासाठी ही सेवा अत्यंत फायदेशीर होती. पूर्वी सकाळी 5:45 वाजता सुटणारी ही गाडी शिक्षण, आरोग्य, आणि विविध उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना दुपारपर्यंत मुंबईत पोहोचवत होती.
advertisement
प्रवाशांमध्ये घट होण्याची शक्यता
नवीन वेळापत्रकामुळे मुंबईला कार्यालयीन कामांसाठी जाणाऱ्या प्रवाशांचे नियोजन बिघडले आहे. परिणामी, छत्रपती संभाजीनगरमधील प्रवाशांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. मोठ्या शहरांना त्वरित जोडणारी ही सेवा सर्वांसाठी उपयुक्त होती, पण आता वेळ बदलल्याने प्रवाशांना अडचणी येणार आहेत.
advertisement
नवीन वेळापत्रक कसे असेल?
वंदे भारत नांदेड येथून पहाटे 5:00 वाजता सुटेल.
परभणी येथे 5:40 वाजता आणि जालना येथे 7:20 वाजता पोहोचेल.
जालन्याहून छत्रपती संभाजीनगरात सकाळी 8:13 वाजता पोहोचून मुंबईला दुपारी 2:25 वाजता पोहोचेल.
मुंबईहून दुपारी 1:10 वाजता निघून छत्रपती संभाजीनगरात सायंकाळी 7:05 वाजता पोहोचेल.
स्वतंत्र गाडीची मागणी
मराठवाड्यातील राजकीय नेत्यांच्या एकमेकांवर कुरघोडीच्या प्रयत्नांमुळे जनशताब्दीसह आता वंदे भारतही गैरसोयीची ठरत आहे. शहरात मोठे उद्योग येत असताना दर्जेदार रेल्वे सेवेचा अभाव शहराच्या प्रतिमेसाठी हानिकारक आहे. नोकरदार आणि व्यावसायिकांना सोयीची ठरेल अशी स्वतंत्र रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मराठवाडा रेल्वे कृती समितीचे स्वानंद सोळंके यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
वेळ नोट करुन ठेवा नाहीतर म्हणाल सांगितलंच नाही! वंदे भारत आता नांदेडमधून सुटणार
Next Article
advertisement
BJP Candidate List BMC Election: भाजपाची फायनल लिस्ट! मुंबईच्या मैदानात ठाकरे बंधूंना कोण भिडणार? पाहा १३६ उमेदवारांची यादी...
भाजपाची फायनल लिस्ट! मुंबईच्या मैदानात ठाकरे बंधूंना कोण भिडणार? पाहा १३६ उमेदवा
  • भाजपने आपल्या उमेदवार यादीत जुन्या चेहऱ्यांसह नवख्यांनादेखील संधी दिली आहे.

  • मुंबईत भाजपा 136, तर शिंदेंची शिवसेना 90 जागा लढवणार आहे.

  • मुंबई महापालिकेची सत्ता काबिज करण्यासाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे.

View All
advertisement