गरिबीवर मात केली, शेती करून 10 लाखांची कमाई केली, सावित्रीच्या लेकीचा 'एसबीआय फाऊंडेशन'कडून सन्मान
- Reported by:Kale Narayan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
दाल मिल उद्योग, शेळीपालन आणि मत्स्यपालनाच्या माध्यमातून दरवर्षी 10 लाखांपेक्षा अधिक निव्वळ उत्पन्न त्या मिळवतात. उमेद अभियानाने दिलेली साथ आणि कुटुंबाच्या पाठिंब्याने त्यांनी हा यशाचा टप्पा पार केलाय.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : सावित्रीच्या लेकी हल्ली आपल्या कर्तुत्वाच्या बळावर उंचच उंच झेप घेत आहेत. कुटुंबाचा पाठिंबा, सहकार्य आणि मार्गदर्शनामुळे राज्यातील महिला उद्योजकांमध्ये नाव कमावणाऱ्या जालना जिल्ह्यातील धारकल्याण येथील संगीता घोडके यांची कहाणी देखील अशीच आहे. दाल मिल उद्योग, शेळीपालन आणि मत्स्यपालनाच्या माध्यमातून दरवर्षी 10 लाखांपेक्षा अधिक निव्वळ उत्पन्न त्या मिळवतात. उमेद अभियानाने दिलेली साथ आणि कुटुंबाच्या पाठिंब्याने त्यांनी हा यशाचा टप्पा पार केलाय. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन एसबीआय फाऊंडेशनने राज्यातून दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस संगीता घोडके यांना दिले आहे. 6 लाख रुपये रोख, सोन्याचे झुंबर, सोन्याची नथ आणि रेशमी साडी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लोकल 18 ने संगीता घोडके यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाविषयी जाणून घेतलं पाहुयात.
advertisement
जालना जिल्ह्यातील धारकल्याण या छोट्याशा खेडेगावात संगीता घोडके राहतात. त्याचे शिक्षण केवळ दहावीपर्यंत झाले. घरी केवळ अडीच एकर शेत जमीन. त्यामुळे लग्न झाल्यानंतर स्वतःच्या शेतातील कामे आटोपून दुसऱ्याच्या शेतावर रोजनदार म्हणून देखील त्यांनी काम केलं. 2015 मध्ये त्या बचत गट आणि उमेद अभियानाशी जोडल्या गेल्या. 2020 पर्यंत त्या केवळ बचत आणि आर्थिक देवाण-घेवाण या स्तरावर काम करत होत्या. मात्र 2021 पासून त्यांनी उमेद अभियानाच्या अंतर्गत विविध लाभ घेण्यास सुरुवात केली.
advertisement
सुरुवातीला पोखरा योजनेअंतर्गत दाल मिल व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला असंख्य अडचणी आल्या. ब्रँड नाव नसल्याने साध्या पॅकिंगमध्ये डाळ विकली. उमेदच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने जालना जीविका नावाने सेंद्रिय डाळींचा ब्रँड उभा केला.
सध्या त्यांच्याकडे जालना शहरातून तसेच ग्रामीण भागात तुरीपासून डाळ तयार करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऑर्डर्स येतात. शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन तसेच शेतात असलेल्या शेततलावामध्ये मत्स्यपालन हा व्यवसाय देखील सुरू केला.
advertisement
या तिन्ही व्यवसायातून दरवर्षी त्यांना 10 लाखांपेक्षा अधिकचा निव्वळ नफा होतो. तीन उद्योग यशस्वीपणे चालवून त्या माध्यमातून चांगला आर्थिक फायदा मिळवणाऱ्या संगीता बुडके यांची दखल घे भरारी मला पंख मिळाले या अंतर्गत एसबीआय फाऊंडेशनने घेतली आणि त्यांना राज्यस्तरीय दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक दिलं.
यशस्वी उद्योजिका म्हणून मला घडवण्यात उमेद अभियान आणि कुटुंबाचा पाठिंबा यांचा मोठा वाटा असल्याचे संगीता घोडके यांनी सांगितलं. एका दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या महिलेला उद्योजक आणि एक चांगलं माणूस म्हणून उमेदने मला घडवलं अशा भावना त्या व्यक्त करतात. इतर महिला उद्योजिकांसाठी संगीता घोडके यांची ही कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
Jan 03, 2025 3:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
गरिबीवर मात केली, शेती करून 10 लाखांची कमाई केली, सावित्रीच्या लेकीचा 'एसबीआय फाऊंडेशन'कडून सन्मान










