advertisement

Environment Day: ना झाडे, ना पक्षी, नुसतं ओसाड माळरान, जालनाकरांनी ठरवलं, आता ड्रोनच फिरवलं!

Last Updated:

Environment Day: जालनाकरांनी पर्यावरणदिनी खास संकल्प केला आहे. ड्रोनच्या माध्यमातून बिजारोपणाचा एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

+
Environment

Environment Day: ना झाडे, ना पक्षी, नुसतं ओसाड माळरान, जालनाकरांनी ठरवलं, आता ड्रोनच फिरवलं!

जालना: पर्यावरण दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. जालना शहरामध्ये काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ओसाड माळरानावर ड्रोनच्या माध्यमातून बियांचं प्रसारण करण्यात येत आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या शुभहस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. शहरातील पारसी टेकडी येथे विविध जंगली वृक्षांच्या बियांचे ड्रोनच्या माध्यमातून प्रसारण करण्यात आले. यात ओसाड माळराणांना हिरवेगार करणारा नाविन्यपूर्ण उपक्रम बीज उत्सव नेमका काय आहे? लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
पूर्वी डोंगर माथ्यावर अवतीभोवती झाडे होती. विस्तारलेली वनक्षेत्र होती. हवा, पाणी, पशुपक्षी बीजवाहक म्हणून काम करायचे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन आपोआपच राखले जायचे. सद्यस्थितीत जालना जिल्ह्याचे वनक्षेत्र केवळ 0.40 टक्के एवढेच राहिले आहे. पूर्वीसारखी झाडे राहिली नाहीत, ना पशुपक्षी. त्यामुळे बीज प्रसार अतिशय संथ गतीने होत आहे. हीच बाब लक्षात घेऊन जालना बीज उत्सवच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उत्कृष्ट बीजे संकलित आणि संरक्षित करून ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डोंगरमाथा, गायरान, नदी, तलाव क्षेत्र इत्यादी ठिकाणी प्रसारित करण्यात येणार आहेत.
advertisement
जालना शहरात सर्वसामान्य नागरिक आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनाचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी ड्रोनच्या माध्यमातून बिजारोपणाचा एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचा आज शुभारंभ करण्यात आला. विविध जंगली वृक्षांच्या बिया जिथे माणसांच्या माध्यमातून शक्य नाहीत, अशा ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून टाकण्यात आल्या.
advertisement
डोंगर, नदीकाठांवर ड्रोनच्या माध्यमातून बीजारोपण करण्यात येतंय. यामुळे जिल्ह्यातील वनक्षेत्र वाढीस लागण्यास मदत होईल. शहरातील अनेक सामाजिक संस्था पर्यावरणाच्या संरक्षणासाठी वेगवेगळ्या स्तरावर काम करत आहेत. या सगळ्या संस्थांना प्रशासन देखील भक्कम पाठिंबा देत असल्याचं जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Environment Day: ना झाडे, ना पक्षी, नुसतं ओसाड माळरान, जालनाकरांनी ठरवलं, आता ड्रोनच फिरवलं!
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement