Chhaava : डोळ्यात पाणी, उर भरून आलं; चिमुकल्याच्या शिवगर्जनेने चित्रपटगृह दणाणलं, व्हिडीओ शेअर करत जयंत पाटील म्हणाले...

Last Updated:

Jayant Patil post on Chhaava Movie : अभिनेता विकी कौशलचा छावा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. अफलातून अभिनयाने विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांचा ऐतिहासिक ठसा रुपेरी पडद्यावर उमटवला आहे.

Jayant Patil post on little boy Shivgarjana At Chhaava Movie Theatre
Jayant Patil post on little boy Shivgarjana At Chhaava Movie Theatre
Jayant Patil post on little boy Shivgarjana : सध्या बॉक्स ऑफिसवर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित छावा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. देशभरातून या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील अनेक ठिकाणी सिनेमा हाऊसफुल असल्याचं पहायला मिळत आहे. कुणी वेश परिधान करून सिनेमा पाहण्यासाठी येतंय, तर अनेकांना सिनेमा पाहून झाल्यावर अश्रू अनावर झाले. सोशल मीडियावर देखील अनेक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. अशातच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये तो सिनेमा संपल्यावर शिवगर्जना करताना दिसतोय. स्वत: विकी कौशलने देखील हा व्हिडीओ शेअर करत प्रतिक्रिया दिली होती. अशातच आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी यावर आपल्या भावना व्यक्त केल्या.

काय म्हणाले जयंत पाटील?

दाटलेल्या भावना, अश्रू भरल्या डोळ्यांच्या कडा आणि इतक्या लहान वयातील संवेदनशीलता पाहून मन भरून आलं, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. मी छावा चित्रपट अद्याप पाहिलेला नाही, पण छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा या पिढीत खोलवर रुजूतेय, याचं मला अधिक समाधान वाटतंय, असंही जयंत पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे. जयंत पाटील यांनी एक्सवर व्हिडीओ शेअर करत भावना व्यक्त केल्या.
advertisement

पाहा Video

advertisement
महाराजsssss गडपती... गजअश्वपती...भूपती... प्रजापती... सुवर्णरत्नश्रीपती... अष्टवधानजागृत... अष्टप्रधानवेष्टित... न्यायालंकारमंडित... शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत... राजनितिधुरंधर... प्रौढप्रतापपुरंदर... क्षत्रियकुलावतंस... सिंहासनाधिश्वर... महाराजाधिराज... राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो, अशी घोषणा चिमुकला देताना पहायला मिळाला. त्यावर विकी कौशल देखील भावूक झाला. त्याने स्वत:च्या अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत समाधान व्यक्त केलं आहे.

आमचा सर्वात मोठा विजय - विकी कौशल

advertisement
दरम्यान, आमची सर्वात मोठी कमाई आहे. तुझा अभिमान आहे मुला, जर मी तुला घट्ट मिठी मारू शकलो असतो, तर किती बरं झालं असतं. तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल आभार. शंभूराजे यांची कथा जगातील प्रत्येक घराघरात पोहोचावी अशी आमची इच्छा आहे. हा आमचा सर्वात मोठा विजय आहे, असं विकी कौशलने पोस्ट करत म्हटलं आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Chhaava : डोळ्यात पाणी, उर भरून आलं; चिमुकल्याच्या शिवगर्जनेने चित्रपटगृह दणाणलं, व्हिडीओ शेअर करत जयंत पाटील म्हणाले...
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement