पर्यटकांसाठी खुशखबर! या तारखेपासून सुरू होणार 'कास पुष्प पठारा'चा हंगाम, ऑनलाईन बुकिंग सुरू
- Published by:Arjun Nalavade
 
Last Updated:
Satara News : जागतिक वारसास्थळ असलेल्या 'कास पुष्प पठारा'चा हंगाम पावसामुळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पाऊस थांबला आणि पठारावरची फुलेही उमलली आहे. त्यामुळे...
Satara News : जागतिक वारसास्थळ असलेल्या 'कास पुष्प पठारा'चा हंगाम पावसामुळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पाऊस थांबला आणि पठारावरची फुलेही उमलली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात ऑनलाईन बुकिंगही सुरू करण्यात आलेली आहे.
यासंदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. 1 सप्टेंबरपासून कास पुष्प पठाराचा हंगाम सुरू करण्यात येणार होता. मात्र पावसामुळे हा हंगाम पुढे ढकल्यात आला आहे. 4 सप्टेंबरपासून हा हंगाम सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी हंगामाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी वाहतुकीवरही चर्चा करण्यात आली.
या बैठकीमध्ये पर्यटाकांनी दिल्या जाण्या सुविधा आणि पार्किंग व्यवस्था यावर चर्चा करण्यात आली. रस्त्यांचा अंदाज घेऊन एकेरी वाहतूक सुरू करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. मात्र पोलीस अधिक्षक तुषार दोषी यांच्या चर्चा केल्यानंतर यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.
advertisement
कास हंगाम आढावा बैठकीसाठी उपवनसंरक्षक अमोल सातपुते, विभागीय वन अधिकारी रेशमा व्होळकरे, सहायक वनसंरक्षक ए. डी. जगताप, सातारा वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपाळे, जावली वनक्षेत्रपाल एस. ए. पवार, पीएसआय संजय जाधव, उप कार्यकारी अभियंता आकाश पाटील, कास पठार कार्यकारी समितीच्या अध्यक्ष संतोष आटपाळे, उपाध्यक्ष बेंडे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
advertisement
हे ही वाचा : Shaktipeeth Highway: सरकारचा मोठा निर्णय! शक्तीपीठ महामार्गातून कोल्हापूरचे 6 तालुके वगळले, वाचा सविस्तर
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 30, 2025 2:28 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पर्यटकांसाठी खुशखबर! या तारखेपासून सुरू होणार 'कास पुष्प पठारा'चा हंगाम, ऑनलाईन बुकिंग सुरू


