Shaktipeeth Highway: सरकारचा मोठा निर्णय! शक्तीपीठ महामार्गातून कोल्हापूरचे 6 तालुके वगळले, वाचा सविस्तर
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होत होता. त्यामुळे या महामार्गाच्या नकाशातील कोल्हापूरातील 6 तालुक्यांना वगळण्याच निर्णय घेण्यात आला आहे. हा नियोजित महामार्ग...
Kolhapur News : 802 किलोमीटर लांबीचा नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या मूळ आराखड्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड आणि आजरा या तालुक्यांना वगळण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे. गुरूवारी महामार्ग आणि भूसंपादना प्रक्रियेत शासनाचा जीआर जारी करण्यात आला, त्या आदेशात याचा स्पष्ट उल्लेख आहे.
शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पातून 6 तालुके वगळले
कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होत होता. त्यामुळे या महामार्गाच्या नकाशातील कोल्हापूरातील 6 तालुक्यांना वगळण्याच निर्णय घेण्यात आला आहे. हा नियोजित महामार्ग वर्ध्यातील पवनारपासून गोव्याच्या सीमेला लागून असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत असणार आहे. कोल्हापूरातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड आणि आजरा या 6 तालुक्यांऐवजी पर्यायी मार्ग शोधण्याची निर्देश शासनाने दिलेले आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या एका अधिकाऱ्याकडून या बातमीला दुजोरा मिळालेला आहे.
advertisement
खर्च किती आणि कर्ज कुठून घेणार?
सध्या पवनारपासून सांगली जिल्ह्यापर्यंतच्या रस्त्याला मंजुरी देण्यात आली आहे. मूळ आराखड्यानुसार गोव्याला पोहोचण्यासाठी हा महामार्ग कोल्हापूरातून जाणे अपेक्षित होते. मात्र, कोल्हापूरकरांच्या विरोधामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पातील भूसंपादनासाठी 20,787 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. यामध्ये 12000 कोटी रूपये मूळ रक्कम आणि 8000 कोटी व्याजापोटी दिले जाणार आहेत.
advertisement
माजी खासदार राजू शेट्टी काय म्हणतात?
यामुळे MSRDC च्या महसुलात काही कारणास्तव घट झाली तर, कर्जाचे हप्ते वेळेवर भरण्यासाठी राज्य सरकार मदत करेल, असेही या जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. हे कर्ज 'हुडको'कडून (HUDCO) घेतले जाणार आहे. दरम्यान, या प्रकल्पाला विरोध करणारे हातकणंगलेचे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, "जरी सहा तालुके वगळले असले तरी गोव्याला जाण्यासाठी महामार्गाला कोल्हापुरातूनच जावे लागेल", कोल्हापूरच्या इतर भागांतही या प्रकल्पाला विरोध असल्याचा दावा शेट्टी यांनी केला आहे.
advertisement
हे ही वाचा : Kolhapur News: कोल्हापूरात ऑक्टोबरपर्यंत पावसाचा मुक्काम; या 2 कारणांमुळे पाऊस सुरूच राहणार!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 30, 2025 2:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shaktipeeth Highway: सरकारचा मोठा निर्णय! शक्तीपीठ महामार्गातून कोल्हापूरचे 6 तालुके वगळले, वाचा सविस्तर