Diwali special trains: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! दिवाळीनिमित्त कोल्हापूरातून सुटणार 3 विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

Last Updated:

Diwali special trains: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून विषेश गाड्या सोडण्यात आल्या आहेत. त्यापैकी 3 गाड्या कोल्हापूरातून सुटणार आहेत. या 3 गाड्यांच्या...

Diwali special trains
Diwali special trains
कोल्हापूर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून विषेश गाड्या (Diwali special trains) सोडण्यात आल्या आहेत. त्यापैकी 3 गाड्या कोल्हापूरातून सुटणार आहेत. या 3 गाड्यांच्या एकूण 160 फेऱ्या होणार आहेत. कोल्हापूर-कलबुर्गी मार्गावर 116 फेऱ्या, कोल्हापूर-मुंबई मार्गावर 20 फेऱ्या आणि कोल्हापूर कटिहार मार्गावर 24 फेऱ्या असणार आहेत.
कोल्हापूर-कलबुर्गी मार्गावरील गाडी
कोल्हापूर-कलबुर्गी मार्गावर 01209/01210 या क्रमांकाने 29 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या काळात आठवड्यातील सहा (शुक्रवार वगळता) धावणार आहे. 6 वाजून 10 मिनिटांना सुटणारी ही गाडी कलबुर्गी दुपारी 4 वाजून 10 मिनिटांना पोहोचणार आहे. त्याचबरोबर दररोज सायंकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी कलबुर्गीतून सुटणारी ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजून 40 मिनिटांनी कोल्हापूरात पोहोचणार आहे.
advertisement
कोल्हापूर-कटिहार मार्गावरील गाडी
कोल्हापूर-कटिहार मार्गावर 01405/01406 या क्रमांकाची गाडी 14 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत साप्ताहित स्पशेल म्हणून धावणार आहे. तर रविवारी सकाळी 9.36 वाजता कोल्हापूरातून सुटणारी ही रेल्वे बिहारच्या कटिहारमध्ये मंगळवारी सकाळी 6.10 मिनिटांनी पोहोचणार आहे. पुन्हा कटिहारमधून मंगळावारी सायंकळी 6.10 वाजून सुटणार असून गुरुवारी दुपारी 3.35 मिनिटांनी कोल्हापूरात पोहोचणार आहे.
advertisement
कोल्हापूर-मुंबई मार्गावरील गाडी
कोल्हापूर-मुंबई मार्गावर 01417/01418 या क्रमांकाची गाडी 24 सप्टेंबर ते 27 नोव्हेंबर या काळात साप्ताहिक स्पेशल म्हणून धावणार आहे. दर बुधवारी रात्री 10 वाजता कोल्हापूरातून ही गाडी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी दीड वाजता मुंबईत पोहोचणार आहे. पुन्हा दर गुरूवारी अडीच वाजता मुंबईतून सुटणारी ही गाडी दर शुक्रवारी पहाटे 4.20 वाजता कोल्हापूरात पोहोचणार आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Diwali special trains: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! दिवाळीनिमित्त कोल्हापूरातून सुटणार 3 विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement