Ajit Pawar Last Audio Call: अजितदादांचा पुतण्याला शेवटचा फोन, एका मेसेजनंतरच्या संवादात काय म्हटले? अपघातापूर्वीची ऑडिओ क्लीप समोर
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Ajit Pawar Last Audio Call: विमान अपघाताबाबत काही प्रश्न उपस्थित करण्यात आले. आता, मात्र विमान अपघातापूर्वी अजित पवारांनी शेवटचा संवाद साधला. त्यावेळी त्यांनी काय म्हटले, याची माहिती समोर आली आहे.
बारामती : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनामुळे पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर, दुसरीकडे विमान अपघाताबाबत काही प्रश्न उपस्थित करण्यात आले. आता, मात्र विमान अपघातापूर्वी अजित पवारांनी शेवटचा संवाद साधला. त्यावेळी त्यांनी काय म्हटले, याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी फोनद्वारे साधलेला शेवटचा संवाद काय होता, हे सर्वांना ऐकवण्यात आला. अजित पवार यांचे चुलत पुतणे श्रीजीत पवार यांच्याशी त्यांचा संवाद झाला. त्यावेळी अजित पवार यांनी काय म्हटले, याची ऑडिओ क्लिप ऐकवण्यात आली.
श्रीजीत पवार यांनी म्हटले की, सकाळी 8.19 मिनिटांनी मी अजित पवार यांना मेसेज केला. रेंजमध्ये मेसेज मिळताच मला अजित पवार यांनी मला फोन केला. विमानात असताना अजित पवार यांनी फोन केला. सर्व जाती धर्म सोबत आपण राहत आहोत सगळ्यांना न्याय देण्याचा पण काम करू असे अजितदादांनी सांगितले असल्याचे श्रीजित पवार यांनी म्हटले.
advertisement
श्रीजीत पवार यांनी सांगितले की, जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीने माळी समाजातील उमेदवार दिला नव्हता. त्यावर आपण त्या समाजातील उमेदवार देऊयात अशी विनंती केली होती. त्यावर अजित पवार यांनी आपण सगळ्याच जाती-धर्माच्या माणसांना सोबत घेऊन जायची अशी भूमिका त्यांनी मांडली. आपण अजितदादांना एक मेसेज केला होता. त्यानंतर अजित पवारांनी मेसेज पाहून विमानातून कॉल केला असल्याचे श्रीजीत पवारांनी सांगितले.
advertisement
अजितदादांनी काय म्हटले?
तुम्हाला काही माहिती नसतं... काही नसतं.. बाळा, आपण सगळ्या जातीधर्माला सोबत घेऊन जातो. सुप्यात माळी समाजाला आपण उमेदवारी दिली. इतर ठिकाणीदेखील ओबीसी उमेदवारांना पण संधी दिली. इतर पक्षांनी उमेदवारी दिली नाही, असे अजित पवारांनी म्हटले.
advertisement
अजितदादा हे कसे कार्यकर्ते आणि पक्षाच्या कामाला महत्त्व देत होते, हे या ऑडिओ क्लिपमधून समोर आले, असल्याचे श्रीजीत पवारांनी सांगितले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने एका कार्यकर्त्यांच्या शंकेवरून आपण अजितदादांना मेसेज केला असे श्रीजीत पवार यांनी स्पष्ट केले.
Location :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
Feb 04, 2026 8:54 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar Last Audio Call: अजितदादांचा पुतण्याला शेवटचा फोन, एका मेसेजनंतरच्या संवादात काय म्हटले? अपघातापूर्वीची ऑडिओ क्लीप समोर










