Kolhapur News: कोल्हापूरात ऑक्टोबरपर्यंत पावसाचा मुक्काम; या 2 कारणांमुळे पाऊस सुरूच राहणार!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Kolhapur News : जागतिक आणि प्रादेशिक हवामान स्थितीत अनेक बदल होत आहेत, त्याचा परिणाम पावसावर होत आहे. पॅसिफिक महासागरातील...
Kolhapur News : जागतिक आणि प्रादेशिक हवामान स्थितीत अनेक बदल होत आहेत, त्याचा परिणाम पावसावर होत आहे. पॅसिफिक महासागरातील 'ला निना' आणि भारतीय महासागरातील निगेटिव्ह इंडियन ओशन डायपोल या दोन प्रमुख हवामान बदलांचा परिणाम पावसावर होत आहे. त्यामुळे राज्यासह कोल्हापूरातही ऑक्टोपर्यंत पावसाचा मुक्काम वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ऑक्टोबरपर्यंक लांबणार पाऊस
बदलत्या हवामानाची स्थिती अशीच राहिली तर परतीचा पाऊस उशिरा सुरू होईल आणि ऑक्टोबरच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाऊस राहील, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केलेला आहे. सद्यस्थिती आयओडी सलग पाच आठवड्यांपासून निगेटिव्ह आहे, त्याता इंडेक्स -1.2 अंशापर्यंत खाली आला आहे. ही स्थिती 2022 नंतरची सर्वात कमी स्थिती आहे. अशात प्रशांत महासागरातही 'ला निना' दिवसेंदिवस विकसित होत आहे. याचा परिणाम पावसांवर होणार आहे. त्यामुळे सप्टेंबर अखेर आणि ऑक्टोबरपर्यंत पाऊस लांबणार आहे.
advertisement
'ला निना' आहे तरी काय?
प्रशांत महासागर अमेरिकेच्या पूर्वभागात आहे. या सागराच्या तापमानातील चढ-उतारामुळे आशिया खंडातील हवामानावर परिणाम जाणवतो. इथे हवामान थंड असेल तर पाऊस जास्त होतो, तर तापमान जास्त असेल तर दुष्काळाची शक्यता असते. सध्या प्रशांत महासागराच्या पूर्व किनाऱ्यावर पेरूजवळ 15 अंश आणि इक्वेडारजवळ 17 अंश सेल्सियस तापमान आहे. त्यामुळे इथले तापमान थंड आहे, परिणामी पाऊस लांबण्याची शक्यता आहे.
advertisement
निगेटिव्ह ‘आयओडी’ म्हणजे काय?
भारतीय महासागरातील पाण्याचं तापमान आणि त्याची तफावत यावरून आयओडी ठरतो. इंडोनेशियाजवळ (पूर्वेकडील भाग) आणि आफ्रिकेजवळ (पश्चिमेकडील भाग) थंड झाला की, त्याला निगेटिव्ह म्हणतात. यामध्ये पर्जन्यामानाचे पट्टे पूर्वेकडे सरकतात आणि भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर अर्थात कोकण, कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जास्त पाऊस पडतो. यंदाच्या वर्षी हा आयओडी निगेटिव्ह असल्यामुळे परतीचा पाऊस लांबणीवर पडला आहे. तो ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत चालणार आहे, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी मांडला आहे.
advertisement
हे ही वाचा : Ration Card Holder : राज्यातील 3 हजार शिधापत्रिकाधारकांसाठी धान्य बंद, शासनाने दिला आदेश; कारण काय?
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 30, 2025 12:54 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Kolhapur News: कोल्हापूरात ऑक्टोबरपर्यंत पावसाचा मुक्काम; या 2 कारणांमुळे पाऊस सुरूच राहणार!


