advertisement

Ration Card Holder : राज्यातील 3 हजार शिधापत्रिकाधारकांसाठी धान्य बंद, शासनाने दिला आदेश; कारण काय?

Last Updated:

Ration Card : राज्यातील ३,097 शिधापत्रिकाधारकांनी जानेवारी ते जून या कालावधीत रेशन दुकानातून धान्य उचलले नाही, त्यामुळे प्रशासनाने त्यांच्या धान्य वाटपावर तात्पुरता बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

News18
News18
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील 3,097 शिधापत्रिकाधारकांनी जानेवारी ते जून 2025 या कालावधीत रेशन दुकानातून धान्य उचलले नाही, म्हणून त्यांचे धान्य वाटप बंद करण्यात आले आहे. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या माहितीनुसार, या लाभार्थ्यांना अपात्र ठरवून त्यांच्या जागी नव्या पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना रेशन वितरण पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
शहरातील रेशन विभाग तीन झोनमध्ये विभागलेला आहे .अ (निगडी), ज (पिंपरी) आणि फ (भोसरी). एकूण 4,89,387 लाभार्थ्यांना रेशनचा लाभ दिला जातो. यामध्ये 3,710 अत्याधुनिक योजना लाभार्थी आणि 88,641 शिधापत्रिकाधारक अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत आहेत. प्रशासनाचे उद्दीष्ट खऱ्या गरजू लाभार्थ्यांना मोफत रेशनचा लाभ मिळवून देणे आहे.
पडताळणी सुरू
'ज' झोनमधील अपात्र लाभार्थ्यांची अंतिम पडताळणी सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तींच्या नावावरून धान्य वाटप कायमस्वरूपी थांबविले जाईल, असे ज झोनचे परिमंडळ अधिकारी यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून अपात्र लाभार्थ्यांची यादी राज्यांना पाठवण्यात आली आहे.
advertisement
नवीन लाभार्थींची निवड
नवीन पात्र लाभार्थींची निवड सातत्याने सुरू आहे. जानेवारी ते जून या कालावधीत धान्य न उचलणाऱ्या लाभार्थ्यांच्या जागी अपंग, निराधार, विधवा आणि गरजू नागरिकांना रेशनचा लाभ दिला जात आहे. 'अ' झोन (निगडी) येथील परिमंडळ अधिकारी विजय क्षीरसागर यांनी स्पष्ट केले की, या यादीत आयकर भरणारे नागरिक, चारचाकी वाहनधारक आणि कंपन्यांचे संचालक यांचा समावेश आहे, जे रेशनचे योग्य लाभार्थी नाहीत.
advertisement
केंद्र सरकारने 30 सप्टेंबर 2025 पर्यंत अशा अपात्र लाभार्थ्यांची नावे शिधापत्रिका यादीतून वगळण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाची ही पावले खऱ्या गरजू नागरिकांना पोषण मिळवून देण्यासाठी आणि वितरण व्यवस्थेत पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Ration Card Holder : राज्यातील 3 हजार शिधापत्रिकाधारकांसाठी धान्य बंद, शासनाने दिला आदेश; कारण काय?
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement