Pub Entry Rules : पबमध्ये जाताय? आधी हे नवे नियम वाचा, अन्यथा होऊ शकते थेट कारवाई

Last Updated:

DigiLocker ID Mandatory For Pub Entry : शहरातील पब, क्लब आणि फ्रेशर्स पार्टीसाठी प्रवेश आता कडक नियमांखाली येणार आहेत.पबमध्ये प्रवेशासाठी डिजीलॉकर आयडी असणे अनिवार्य असल्याचे आदेश दिले आहेत.

News18
News18
पुणे: पुण्यातील पब, क्लब आणि रेस्टॉरंट्समध्ये कॉलेजच्या फ्रेशर्स पार्टींवर बंदी घालण्यात आली आहे. यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नवीन आदेश जारी केले आहेत, ज्यात पबमध्ये प्रवेशासाठी डीजी लॉकरमधील ओळखपत्राची पडताळणी अनिवार्य केली आहे. राजा रावबहादूर मिल्समधील कीकी पबमध्ये मनसेच्या आंदोलनानंतर फ्रेशर्स पार्टी बंद करण्यात आल्या होत्या, आणि त्यानंतर पोलीस प्रशासन आता कठोर कारवाईसाठी सज्ज आहे.
पुण्यातील विविध पब, क्लब आणि रेस्टॉरंट्समध्ये झालेल्या फ्रेशर्स पार्टींविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने सक्रिय आंदोलन केले होते. शहरातील बदलती पार्टी संस्कृती धोकादायक स्थितीत पोहोचल्याचे या आंदोलनात सांगितले गेले. पुण्यात सर्रास चालू असलेल्या अशा पार्टींमुळेच पोर्शे प्रकरणासारख्या अपघातांची उकल झाली होती. दोन तरुणांचा मृत्यू झाल्यानंतरही पोलीस प्रशासनाने पब्जच्या नियमात अधिक काटेकोरपणा आणावा, अशी मागणी मनसेने केली होती.
advertisement
मनसेच्या प्रतिनिधींनी पोलिस आयुक्तांना भेट देऊन निवेदन सादर केले. यावेळी शहराध्यक्ष धनंजय दळवी यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्र संघटक प्रशांत कनोजिया, राज्य सचिव आशिष साबळे, उपाध्यक्ष सचिन पवार, कार्यकारिणी सदस्य अभिषेक थिटे, रूपेश घोलप, शहर उपाध्यक्ष विक्रांत भिलारे, विभाग अध्यक्ष हेमंत बोळगे, आशुतोष माने, केतन डोंगरे, संतोष वरे, नीलेश जोरी, सचिव मयूर शेवाळे, अक्षय पायगुडे आणि इतर पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
advertisement
दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभाग बार आणि पब्जला मद्यविक्रीसाठी परवाना जारी करतो. परंतु 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना मद्यविक्री झाल्यास, उत्पादन शुल्क विभागाकडे त्या पबचा परवाना रद्द करण्याचा अधिकार आहे. तरीसुद्धा, अनेक ठिकाणी हा नियम 'अर्थपूर्ण' रीतीने पाळला जात नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. या तक्रारीसंबंधी भरारी पथकही प्रभावी कारवाई करत नाही, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे पब्जमधील नियम अधिक काटेकोरपणे पाळला जावा, अशी मागणी प्रशासनाकडूनही व्यक्त होत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pub Entry Rules : पबमध्ये जाताय? आधी हे नवे नियम वाचा, अन्यथा होऊ शकते थेट कारवाई
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement