कस्टमर आला की मुली दाखवायचा... कसा चालायचा धंदा? पीडितेना सांगितले मॅनेजरचे काळे कारनामे; धाराशिव हादरले
- Published by:Prachi Amale
Last Updated:
विवाहित महिलेला चक्क वेश्याव्यवसायाच्या दलदलीत ओढण्यात आले असून या महिलेने अत्यंत धाडसाने या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
धाराशिव: कला केंद्रांच्या' भिंतींआड महिलांच्या शोषणाचे भयानक सत्र सुरू असल्याचे विदारक वास्तव धाराशिवमध्ये समोर आले आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून आसरा शोधणाऱ्या एका हतबल विवाहित महिलेला चक्क वेश्याव्यवसायाच्या दलदलीत ओढण्यात आले. या महिलेने अत्यंत धाडसाने या रॅकेटचा पर्दाफाश केला असून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला विवाहित असून तिचा पती तिला दारू पिऊन सतत मारहाण करत होता. या छळाला कंटाळून तिने आपली मैत्रीण सोनाली वाघ हिच्याकडे मदत मागितली. सोनालीने तिला आधार देण्याचे आमिष दाखवून आळणी येथील 'पिंजरा कला केंद्रात' आणले. मात्र, हा आधार नसून एका मोठ्या संकटाची सुरुवात होती. सोनालीने पीडितेची ओळख कला केंद्राची मालकीण कविता कोळपेकर आणि मॅनेजर सचिन कापसे यांच्याशी करून दिली.
advertisement
डांबून ठेवले अन् वेश्याव्यवसायास भाग पाडले
तक्रारीनुसार, सचिन कापसे हा ग्राहक आल्यावर त्यांना मुली दाखवायचा आणि पसंत पडल्यास त्यांना वेश्याव्यवसायासाठी केंद्राबाहेर पाठवले जायचे. हा सर्व प्रकार लक्षात आल्यावर पीडितेने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मालकीण कोळपेकरने तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिला धाराशिवमधील पिंजरा, महाकाली, साई कला केंद्र आणि लातूरमधील बुधडा कला केंद्रात आलटून पालटून डांबून ठेवण्यात आले. तिथे तिला मारहाण करत पैशांच्या बदल्यात बळजबरीने देहविक्रय करण्यास भाग पाडले गेले. मारहाणीनंतर मॅनेजरन सचिन एका ग्राहकासोबत पीडित महिलेला येडशीच्या लॉजवर घेऊन गेला तिथे त्याने अनैतिक संबंध ठेवले. लग्नाचे आमिष दाखवून सख्ख्या बहीणीच्या केंद्रावर घेऊन गेला आणि तिथे डांबून ठेवले. त्यानंतर सातूर येथे रेखा जाधवकडे ३० हजार रुपये घेऊन कामाला ठेवले आणि वेश्याव्यवाय करण्यास भाग पाडले,
advertisement
पोलीस कारवाई आणि पुढील तपास
पीडित महिलेने या नरकयातनेतून कशीबशी सुटका करून घेत पोलीस ठाणे गाठले आणि आपबिती सांगितली. या तक्रारीनंतर पोलिसांनी 9 जणांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. कला केंद्राच्या नावाखाली जिल्ह्यात आणखी किती ठिकाणी अशा प्रकारे महिलांचे शोषण सुरू आहे, याचे धागेदोरे आता पोलीस शोधत आहेत. पार्ट्या भरवून नर्तिका डान्स करून लोकांना खूश करायच्या नावाखाली वेश्याव्यवसायाकडे ढकलण्याचे मोठे रॅकेट चालत होते.
advertisement
हे ही वाचा :
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 21, 2026 5:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कस्टमर आला की मुली दाखवायचा... कसा चालायचा धंदा? पीडितेना सांगितले मॅनेजरचे काळे कारनामे; धाराशिव हादरले










