बहीण-भावाच्या नाश्ता सेंटरवर मिळतो अनोखा पदार्थ, कोल्हापुरात फक्त इथेच मिळतो, खवय्यांची होते मोठी गर्दी
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Saiprasad Nagesh Mahendrakar
Last Updated:
मिरजकर तिकटी येथील अंधशाळेच्या शेजारीच पल्लवी आणि विशाल यांचे घरचा स्वाद नावाचे हे नाष्टा सेंटर आहे. सकाळी 9 ते रात्री 9.30 पर्यंत हे नाष्टा सेंटर सुरू असते.
साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापुरात खवय्यांना रोज काहीना काही नवनवीन पदार्थ खायला मिळत आहेत. त्यातच आता कोल्हापुरातील मिरजकर तिकडे या ठिकाणी बहिण भावाकरवी चालवल्या जाणाऱ्या नाष्टा सेंटरवर एक अनोखा पदार्थ मिळू लागला आहे. व्हेज ब्रेड रोल असे या पदार्थाचे नाव आहे. कोल्हापुरात इतरत्र कुठेही न मिळणारा असा हा पदार्थ आहे. त्यामुळे हा पदार्थ खायला कित्येक कोल्हापूरकर या ठिकाणी सध्या गर्दी करत आहेत.
advertisement
कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरात अनेक महिला आप्पे विक्रीचा व्यवसाय करत असतात. अशाच प्रकारे पल्लवी पाटील यादेखील आप्पे विक्री करत होत्या. काही कारणास्तव त्यांनी स्वतःचा व्यवसाय बंद केला. तर त्यांचे भाऊ विशाल पन्हाळकर हे कोल्हापुरातील मिरजकर तिकटी या ठिकाणी इडली आणि आप्पे मिळणारे नाष्टा सेंटर साधारण वर्षभरापासून चालवत होते. मात्र, कोल्हापूरकरांसाठी एखादा नवीन पदार्थ घेऊन येण्याचे ठरवून दोघांनी एकत्रित येऊन काम करण्याचा निर्णय घेतला. त्यातच व्हेज ब्रेड रोल हा पदार्थ गेल्या जवळपास दीड महिन्यांपूर्वी विक्री करण्यास सुरुवात केली. सध्या हळूहळू करत हा पदार्थ कोल्हापूरकरांच्या पसंतीस पडत आहे.
advertisement
कशी सुचली नवीन संकल्पना -
खरंतर, हा व्हेज पेट्रोल म्हणजे एखाद्या तळलेल्या माशासारखा दिसणारा पदार्थ आहे. पल्लवी यांच्या पतींनी मागे 15 ते 16 वर्षांपूर्वी पुण्यामध्ये केटरिंगचा कोर्स केला होता. तेव्हा यापेक्षा काहीतरी वेगळा असा पदार्थ त्यांना तिथे पाहायला मिळाला होता. त्यामध्येच बदल करत त्यांनी हा व्हेज प्लेट रोल बनवायला पल्लवी यांना शिकवला. तोच पदार्थ सध्या पल्लवी या त्यांच्या नाष्टा सेंटरवर विकत आहेत.
advertisement
काय आहे व्हेज ब्रेड रोल -
हा व्हेज ब्रेड रोल म्हणजे ब्रेडच्या एक स्लाईस वापरून केलेला पदार्थ आहे. ब्रेडचा स्लाईस बीट वापरुन लाल रंग आणलेल्या पाण्यात बुडवून ओला केला जातो. यामध्ये भरण्यासाठी बटाटा वड्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या सारणाप्रमाणेच बटाट्याच्या पिवळ्या भाजीचे सारण बनवले जाते. ब्रेडचे पूर्ण पाणी काढून झाल्यानंतर त्यामध्ये बटाट्याचे सारण भरले जाते. पुढे त्याला विटी दांडू खेळातील एका विटीप्रमाणे आकार दिला जातो. पुढे ब्रेडचा चुरा आणि रव्याच्या मिश्रणात हा ब्रेड घोळवला जातो. एकदा मध्यम आचेवर तांबुस होईपर्यंत तेलात हा रोल तळला जातो. ग्राहकाला विविध तीन प्रकारच्या चटण्यांसोबत हा ब्रेड रोल खाण्यासाठी दिला जातो, अशी माहिती पल्लवी यांनी लोकल18 शी बोलताना दिली.
advertisement

व्हेज ब्रेड रोल
मिरजकर तिकटी येथील अंधशाळेच्या शेजारीच पल्लवी आणि विशाल यांचे घरचा स्वाद नावाचे हे नाष्टा सेंटर आहे. सकाळी 9 ते रात्री 9.30 पर्यंत हे नाष्टा सेंटर सुरू असते. दरम्यान फक्त 10 रुपयांना इतका चविष्ट आणि वेगळा नाष्टा मिळत असल्यामुळे अनेक अबालवृद्ध या ठिकाणी आता गर्दी करत असतात.
advertisement
पत्ता : घरचा स्वाद, मिरजकर तिकटी जवळ, मंगळवार पेठ, कोल्हापूर 416012
संपर्क : विशाल पन्हाळकर - +91 7026151617
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
July 26, 2024 1:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
बहीण-भावाच्या नाश्ता सेंटरवर मिळतो अनोखा पदार्थ, कोल्हापुरात फक्त इथेच मिळतो, खवय्यांची होते मोठी गर्दी