पावसाळ्यात फिरायला जाताय?, सोशल मीडियाचा नाद सोडा, या गोष्टींची नक्की घ्या काळजी, अन्यथा होईल पश्चाताप

Last Updated:

आपली एखादी चूक आपल्याला आयुष्यभरासाठी महागात पडू शकत असते. त्यामुळेच पावसाळ्यात पर्यटनाला बाहेर पडल्यानंतर नेमकी कशी आणि काय काळजी घ्यावी याबाबत माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे याच विषयासंदर्भात लोकल18 च्या टीमने कोल्हापूरच्या सागर पाटील यांच्याशी संवाद साधला.

+
ट्रेकिंग 

ट्रेकिंग 

साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर : मान्सूनच्या आगमनानंतर संपूर्ण उन्हाळ्यामध्ये त्रस्त झालेले अनेक लोक, निसर्गप्रेमी तसेच शिवप्रेमी सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यात, गड-किल्ल्यांवर वर्षा पर्यटनासाठी बाहेर पडत असतात. हे वर्षा पर्यटन, ट्रेकिंग करत असताना आपल्याला नेहमीच काळजी घेण्याची गरज असते. आपली एखादी चूक आपल्याला आयुष्यभरासाठी महागात पडू शकत असते. त्यामुळेच पावसाळ्यात पर्यटनाला बाहेर पडल्यानंतर नेमकी कशी आणि काय काळजी घ्यावी याबाबत माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे याच विषयासंदर्भात लोकल18 च्या टीमने कोल्हापूरच्या सागर पाटील यांच्याशी संवाद साधला.
advertisement
सागर पाटील हे कोल्हापूर हायकर्स या संस्थेचे संस्थापक आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ते कोल्हापूर हायकर्स या ट्रेकिंग ग्रुपच्या माध्यमातून अडव्हेंचेर टुरिझम क्षेत्रात काम करत आहेत. लोकल18 शी बोलताना त्यांनी पावसाळ्यात पर्यटनाला जाताना नेमकी काय काय काळजी घ्यावी, याबाबत महत्त्वाची माहिती दिली. ते काय म्हणाले हे जाणून घेऊयात.
1) वर्षा पर्यटनाला एखादा धबधब्याला किंवा ट्रेकिंगवर जात असताना बहुदा कुणी एकटे जात नाही. एखाद्या ग्रुप सोबतच हे ट्रेकिंग केले जाते. अशावेळी सर्वात आधी कोणता ट्रेक आहे, ट्रेक आयोजित करणाऱ्या ग्रुपचा अनुभव कसा आहे, व्यावसायिकदृष्ट्या त्यांनी ती मोहीम कशी आयोजित केली आहे, या सगळ्यावर खूप बारकाईने विचार केला पाहिजे.
advertisement
2) सोशल मिडियावर येणाऱ्या जाहिरातींना अनेक जण बळी पडतात. अर्धवट माहितीनुसार संयोजन करणाऱ्या लोकांमुळे तसेच आवश्यक साधन सामुग्री आणि अनुभवाच्या कमतरतेमुळे गेलेले लोक वर्षा पर्यटनाच्या ठिकाणी अनेकदा अडकले आहेत. त्यामुळे स्वतःची सर्वात जास्त काळजी घेतली पाहिजे. स्वतःजवळ देखील प्रथमोपचार किट ठेवणे आवश्यक असते.
advertisement
3) एखाद्या वर्षा पर्यटनाच्या ठिकाणी तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार दुर्दैवाने काही चुकीचा प्रकार घडू शकतो. अशावेळी रेस्क्यू करण्याची गरज पडल्यास तसे मोबाईल नंबर तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अशा ठिकाणी एकट्याने जाणे नेहमीच टाळावे.
जिद्द, चिकाटीच्या जोरावर तरुणाने उभारला फॅब्रिकेशनचा उद्योग, सोलापूरच्या रहिमानची प्रेरणादायी गोष्ट!
4) पावसामुळे बऱ्याचदा गड-किल्ल्यांची तटबंदी ठिसूळ झालेली असते. डोंगरावरुन दरड कोसळण्याची भीती असते, अशा ठिकाणी विशेष सावधानता बाळगणे गरजेचे असते. अशा अवघड ठिकाणी जाऊन फोटो काढणे सक्तीने टाळले पाहिजे.
advertisement
5) अनोळख्या ठिकाणी वर्षा पर्यटनाला गेल्यावर एखाद्या ओढ्यात किंवा झऱ्यामध्ये पाण्यामध्ये उतरणे, शक्यतो टाळावेच. पण जर पाण्यात उतरण्याचा विचार केला तर प्रवाहाचा अंदाज घेऊन उतरावे. मात्र, हे सगळे करत असताना कुठलीही अतिशयोक्ती करू नये.
6) सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा सोशल मीडियासाठी फोटो व्हिडिओ काढण्यासाठी बरेच जण स्वतःचा जीव धोक्यात घालत असतात. मात्र, त्यामुळे बऱ्याच दुर्घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे काही व्ह्यूज आणि लाईकसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालण्यात टाळावे.
advertisement
काय काय साहित्य वर्षा पर्यटनाला घेऊन जावे -
वर्षा पर्यटनाला जाताना काही गोष्टी आवर्जून आपल्यासोबत न्याव्यात. यामध्ये एक प्रथमोपचार किट, तुमचे जादाचे कपडे, एक चांगली टॉर्चसोबत घेतली पाहिजे. पावसाळी वातावरणाचा विचार करता तसा पेहराव करूनच वर्षा पर्यटनाला बाहेर पडावे. तसेच तुम्ही ज्याठिकाणी जात आहात, कुणासोबत जात आहात, त्याची माहिती जवळच्या व्यक्तीला देऊन आपल्या सोबतच्या दोघांचे फोन नंबरही घरी दिले पाहिजेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
पावसाळ्यात फिरायला जाताय?, सोशल मीडियाचा नाद सोडा, या गोष्टींची नक्की घ्या काळजी, अन्यथा होईल पश्चाताप
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement