दोन मैत्रिणींनी केला अनेक अडचणींचा सामना, पण न खचता आज याठिकाणी उभं केलं अनोखं स्वयंपाकघर
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर शहरात राहणाऱ्या नंदिनी चपळगावकर आणि ज्योती कवर या दोघींनी मिळून सुरुवातीला पोळी भाजी केंद्राची स्थापना केली. त्यांनी काही दिवस पोळी भाजी विकली आणि त्यानंतर त्यांनी याच पोळी भाजी केंद्राचे रूपांतर हे मोठ्या स्वयंपाक घरात केलं.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : मित्र-मैत्रिणींचं स्थान हे आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा असतं. प्रत्येक सुख-दुःखामध्ये हे आपल्या सोबत असतात. छत्रपती संभाजी नगर शहरातील दोन मैत्रिणींनी मिळून एका स्वयंपाक घराची स्थापना केली. नंदिनी चपळगावकर आणि ज्योती कवर या दोघींनी मिळून 'प्रथम स्वयंपाकघर' म्हणून एक व्यवसाय सुरू केला. आज व्यवसायातून त्या दोघीजणी चांगलं उत्पन्न कमवत आहेत.
advertisement
छत्रपती संभाजीनगर शहरात राहणाऱ्या नंदिनी चपळगावकर आणि ज्योती कवर या दोघींनी मिळून सुरुवातीला पोळी भाजी केंद्राची स्थापना केली. त्यांनी काही दिवस पोळी भाजी विकली आणि त्यानंतर त्यांनी याच पोळी भाजी केंद्राचे रूपांतर हे मोठ्या स्वयंपाक घरात केलं. त्यांनी प्रथम नावाचं स्वयंपाकघर सुरू केलं. संभाजीनगर शहरातील गोपाल टी परिसरामध्ये त्यांचं हे स्वयंपाक आहे. याठिकाणी त्या अस्सल आणि पारंपारिक महाराष्ट्र पदार्थ ताजे करून विकतात.
advertisement
सुरुवातीला आम्हाला खूप अडचणी आल्या -
लोकल18 शी बोलताना ज्योती कवर म्हणाल्या की, 1998 साली आम्ही हे स्वयंपाक सुरुवात केलं. सुरुवातीला आम्ही शहरातील संत एकनाथ रंग मंदिराच्या समोर एका गाड्यावरती त्याची सुरुवात केली होती. आम्ही सुरुवातीला फक्त पोळी, भाजी आणि चटण्या, कुरडया, खारोड्या हेच विकण्यासाठी ठेवत होतो. सुरुवातीला आम्हाला खूप अडचणी आल्या. पोळी, भाजी विकत घेऊन खावी, ही आपल्या लोकांची मानसिकता नव्हती. तेव्हा आम्ही घरूनच पोळी, भाजी बनवून आणायचो आणि या ठिकाणी विकायचो. पण तरीही काही दिवस आमची पोळी भाजीची विकल्या जात नव्हती. अनेक अडचणी आल्या. पण या अडचणींवर आम्ही मात करत आम्ही आमचा व्यवसाय तसाच चालू ठेवला.
advertisement
जिद्द, चिकाटीच्या जोरावर तरुणाने उभारला फॅब्रिकेशनचा उद्योग, सोलापूरच्या रहिमानची प्रेरणादायी गोष्ट!
विशेष म्हणजे आम्ही हा व्यवसाय सुरू करण्यासाठी घरातून एक रुपयाही घेतला नाही आणि स्वतःच्या जमापुंजीतून आम्ही या व्यवसायाची आम्ही सुरुवात केली. हळूहळू आमचा व्यवसाय चांगला चालू लागला. सध्या पोळी भाजीला याठिकाणी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. संभाजीनगर शहरात सर्वात आधी आम्हीच पोळी भाजी केंद्राची सुरुवात केली, असं त्यांनी सांगितलं.
advertisement
आम्ही हा व्यवसाय वाढवला आणि प्रथम स्वयंपाक घर म्हणून सुरुवात केली. आज आमच्याकडे 20 ते 30 महिला काम करतात. विशेष म्हणजे आमच्याकडे ज्या महिला काम करतात, त्या 15 ते 20 वर्षापासून आजही आमच्यासोबत काम करत आहेत. आम्ही या ठिकाणी थालीपीठ, पोळी, भाजी, पिठलं, भाकरी, चिवडा, चकली, लाडू, बालुशाही, सुरळीच्या वड्या, पराठा हे पदार्थ विकतो. तसेच आम्ही नेहमी ताजे पदार्थ करूनच आमच्या ग्राहकांना देतो.
advertisement
शून्यातून केली स्टुडिओची सुरुवात ते 200 हून अधिक लघुपटांची निर्मिती, सोलापूरच्या सचिन जगताप यांची अनोखी गोष्ट!
आम्ही एका छोट्या गाड्या वरून या व्यवसायाची सुरुवात केली होती आणि आज आम्ही दोघींनी आमच्या स्वतःच्या पैशातून दुकानाचे चार गाळे विकत घेतले आहेत, याचा आम्हाला खूप अभिमान आहे, या भावना नंदिनी आणि ज्योती या दोन्ही महिलांनी लोकल18 शी बोलताना व्यक्त केल्या.
advertisement
या स्वयंपाक घरामध्ये नेहमीच ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दोघी मैत्रिणींनी सुरू केलेला हा व्यवसाय आज संभाजीनगर शहरांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. यांच्या पदार्थांना शहरात मोठी मागणीही आहे. विशेष म्हणजे त्यांनी स्वतःसाठी काहीतरी करायचं म्हणून व्यवसाय सुरू केला आणि आज त्यांनी तब्बल 20 ते 30 महिलांना रोजगार हा उपलब्ध करून दिला आहे. या व्यवसायातून त्या चांगले उत्पन्नही कमवत आहेत.
view commentsLocation :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
June 26, 2024 12:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
दोन मैत्रिणींनी केला अनेक अडचणींचा सामना, पण न खचता आज याठिकाणी उभं केलं अनोखं स्वयंपाकघर

