Kolhapur News : दारुबंदीवरुन महिलांमध्ये जुंपली; कोल्हापुरातील घटना, व्हिडीओ व्हायरल
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Kolhapur News : शिरोळ तालुक्यातील शिरढोण गावात दारुबंदीवरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झाली.
ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी
कोल्हापूर, 28 ऑगस्ट : दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले. कैकजण रस्त्यावर आले. या व्यसनापाई रावाचेही रंक झाले. पुरुषांच्या दारुच्या व्यसनाचे बळी नेहमी महिला ठरतात. त्यामुळे अनेकदा महिला पोलिसांच्या मधील मदतीने गावात दारूबंदीकडे वळतात. मात्र, आता दारुबंदीवरुनही वाद होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे.
advertisement
कोल्हापूर जिल्ह्यात दारूबंदीच्या ठरावावरून ग्रामसभेत जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. शिरोळ तालुक्यातील शिरढोण गावात दारुबंदीवरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. 2016 ला गावात दारूबंदी झाली असताना दोन दुकानांना परवानगी देण्याच्या प्रस्तावावरून वाद झाला. यावरुन महिला ग्रामसभेत हाणामारी झाली. गोंधळाच्या वातावरणात दारू बंदी कायम करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
advertisement
अमरावतीत अनिधिकृत दारुविक्री कायम करण्याचा ठराव
दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले. कैकजण रस्त्यावर आले. या व्यसनापाई रावाचेही रंक झाले. पुरुषांच्या दारुच्या व्यसनाचे बळी नेहमी महिला ठरतात. त्यामुळे अनेकदा महिला पोलिसांच्या मधील मदतीने गावात दारूबंदीकडे वळतात. मात्र, अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील आष्टा ग्रामपंचायतीमध्ये गावकऱ्यांनी चक्क अनधिकृत सुरू असलेली दारू विक्री सुरू रहावी यासाठीचा ग्रामसभेचा ठराव एकमताने पास केला. या घटनेने जिल्ह्यात एकच चर्चा सुरू झाली.
advertisement
कोल्हापूर जिल्ह्यातील गावात दारुबंदीवरुन हाणामारी#kolhapur pic.twitter.com/S2vUo0BXuN
— News18Lokmat (@News18lokmat) August 28, 2023
अमरावती जिल्ह्यतील आष्टा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या गावात भिकाजी महाराज यांचे मोठे संस्थान आहे. या संस्थानने ग्रामपंचायतकडे दारूबंदीसाठी अर्ज दिला. त्यावर ग्रामसभेत दारूबंदीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र, या प्रस्तावाला ग्रामसभेतील काही गावकऱ्यांनी विरोध केला. चक्क अनधिकृतरित्या सुरू असलेली दारूबंदी होऊ नये व ती दारू विक्री सुरूच राहावी यासाठी गावकऱ्यांनी बहुमत दर्शविले. यामध्ये हात वर करून बहुमत दर्शवित असताना विशेष म्हणजे यामध्ये महिलांनी सुद्धा हात वर करून याला बहुमत दर्शविले. हा अजब प्रकार आष्टा ग्रामपंचायतमध्ये घडला.
advertisement
एकीकडे पुरोगामी महाराष्ट्रात दारूबंदी व्हावी यासाठी गावकरी आग्रही असतात. मात्र या ठिकाणी दारूबंदीलाच गावकऱ्यांनी विरोध केल्याचं पाहायला मिळालय. खरतर यासाठी गावातील सरपंच आणि गावातील काही पुढाऱ्यांनी एकत्र येऊन दारुबंदीसाठी प्रयत्न करायला हवेत. इथं मात्र याच्या अगदी उलट घडलं आहे. दरम्यान, ज्या संस्थानने दारू बंदीसाठी अर्ज दिला होता. त्यांनी हा ठराव झाल्याने आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. गावात असलेल्या शाळा व भिकाजी महाराज संस्थांन जवळच अवैधरित्या दारू विक्री होते.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
August 28, 2023 9:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Kolhapur News : दारुबंदीवरुन महिलांमध्ये जुंपली; कोल्हापुरातील घटना, व्हिडीओ व्हायरल


