बिबट्या नव्हे गुंडाचा हल्ला, कोल्हापुरातील दाम्पत्याच्या मृत्यूचं गूढ समोर, जेवण न दिल्याने डबल मर्डर!
- Published by:Ravindra Mane
 - Reported by:Dnyaneshwar Pandurang Salokhe
 
Last Updated:
Crime in Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात काही दिवसांपूर्वी बिबट्याने वृद्ध दाम्पत्यावर हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात काही दिवसांपूर्वी बिबट्याने वृद्ध दाम्पत्यावर हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. पण या दाम्पत्याचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात नव्हे तर एका गुंडाने केलेल्या हल्ल्यात झाल्याची माहिती समोर आली आहे. जेवण न दिल्याने एका अट्टल गुन्हेगारांने वृद्ध दांपत्याचा खून केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.
वृद्ध कंक दाम्पत्य बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले की त्यांची हत्या झाली? याबाबत सुरुवातीपासून संशय व्यक्त केला जात होता. त्याचबरोबर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील बिबट्याच्या हल्ल्यात कंक दांपत्याचा खून झाल्याचं नाकारलं होते. त्यामुळे पोलिसांनी आजूबाजूच्या रिसॉर्टवरील सीसीटीव्हीच्या आधारे तपास केला.
तपासाअंती रेकॉर्डवरील गुन्हेगाराने थंड डोक्याने रचलेला दुहेरी हत्याकांड उघडकीस आणला आहे. याप्रकरणी आरोपी विजय मधुकर गुरव याला शाहूवाडी पोलिसांनी अटक केली आहे. विजय गुरव हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा, बाललैंगिक अत्याचारासह 20 हून अधिक मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. हा गुन्हेगार गुन्हा केल्यानंतर डोंगराळ भागात लपत होता.
advertisement
नेमकी घटना काय घडली?
शाहूवाडी तालुक्यातील परळे निनाईपैकी गोळीवणे वसाहतीमध्ये 19 ऑक्टोबर 2025 रोजी 75 वर्षांचे निनू यशवंत कंक आणि 69 वर्षांची पत्नी रखुबाई कंक यांच्यावर बिबट्यांना हल्ला केल्यामुळे मृत्यू झाला, अशी माहिती वाऱ्यासारखी पसरली होती. कडवी धरणाजवळ सापडलेल्या मृतदेहावर अनेक वर्मी घावाच्या जखमा होत्या. त्यावरून वनविभागाने बिबट्याच्या हल्ल्यात कंक दापत्याचा मृत्यू झाला नाही असा निष्कर्ष काढला.
advertisement
त्यानंतर शाहूवाडी पोलिसांनी यासंदर्भात अधिक तपास करून कंक यांच्या शेताजवळ शेळी, मेंढ्या, कुत्रे असताना फक्त या दाम्पत्यांवरच बिबट्याचा हल्ला कसा झाला? मृतदेहावर बिबट्याच्या पंजांचे ठसे किंवा ओरबडल्याच्या खुणा का नव्हत्या? तसेच दोन्ही मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी कसे आढळले? याचे कारण शोधायला सुरुवात केली. त्यावेळी जंगलात लपलेले असताना जेवण न दिल्याच्या रागातून रेकॉर्डवरील गुन्हेगार विजय गुरव यानेच कंक दाम्पत्याचा खून केल्याचं समोर आलं. या खुनामागे आणखी काही कारण आहे का? यात दुसऱ्या व्यक्तीचा सहभाग आहे का? याचा तपास शाहूवाडी पोलीस करत आहे.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
November 04, 2025 1:08 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
बिबट्या नव्हे गुंडाचा हल्ला, कोल्हापुरातील दाम्पत्याच्या मृत्यूचं गूढ समोर, जेवण न दिल्याने डबल मर्डर!


