advertisement

Latur Crime : लातुरमध्ये प्राध्यापकाचे अपहरण, ऑनलाईन 8 लाख उकळले, 50 लाखांची मागणी नंतर...

Last Updated:

Latur Crime : 50 लाखासाठी शहरातील एका प्राध्यापकाचे चौघांनी अपहरण करुन जबरदस्तीने 8 लाख 14 हजार काढून घेतले.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
लातूर, 20 ऑक्टोबर (नितिन बनसोडे, प्रतिनिधी) : शहरातील एका प्राध्यापकाचे चौघांनी अपहरण करुन जबरदस्तीने 8 लाख 14 हजार उकळले. इतकेच नाही तर 50 लाखांची खंडणी देखील मागितली. तसेच धनादेश, बॉन्डवर स्वाक्षऱ्या घेऊन कर्नाटकातील भालकी येथे सोडून दिले. या प्रकरणानंतर लातूरमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी प्राध्यापकाच्या फिर्यादीवरुन उदगीर ग्रामीण पोलिसांत चौघांविरुध्द अपहरण, खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
उदगीर ग्रामीण पोलिसांनी सांगितले, फिर्यादी प्रा. सदाविजय बसवप्रकाश विश्वनाथे (32, रा. कल्पना चौक, उदगीर) यांना आरोपी गफार इस्माईल पठाण उर्फ बबलू पठाण (रा. समतानगर, उदगीर), पवन बिरादार शिरोळकर, बालाजी व अनोळखी इसम यांनी आपसात संगनमत केले. या चौघांनी सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शहरातील बिदर गेट येथून फिर्यादीचे अपहरण केले. त्यांना सुरुवातीला लातूर, औराद शहाजानी येथे नेऊन प्लॉस्टिक पाईप व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर फियादीकडे 50 लाख रुपये खंडणीची मागणी केली. तसेच फियादी व त्याच्या मित्रांकडून ऑनलाईन पध्दतीने बळजबरीने पैसे मागवून घेतले. तद्नंतर वेगवेगळ्या ठिकाणच्या एटीएममधून रोख रक्कम काढण्यास फिर्यादीस भाग पाडले. एकूण 8 लाख 14 हजार रोख काढून घेतले. त्यानंतर फिर्यादीच्या बॉन्ड खरेदी व बँकेच्या चेकवर सह्या घेतल्या.
advertisement
ही माहिती घरच्यांना दिली तर तुला जीवे ठार करू अशी दमदाटी देऊन भालकी येथे सोडून देऊन निघून गेले, अशी फिर्याद प्राध्यापक सदावीजय विश्वनाथे यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यानंतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
Latur Crime : लातुरमध्ये प्राध्यापकाचे अपहरण, ऑनलाईन 8 लाख उकळले, 50 लाखांची मागणी नंतर...
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement